कचरा व्यवस्थापन (Garbage) पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. Dainik Gomantak
गोवा

होंडा पंचायत कचरा व्यवस्थापनामध्ये स्वयंपूर्ण बनणार

या कचरा (Garbage) प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामांचा खर्च पंचायत फंडातून करणार असल्याची माहिती पंचायत सुत्रांकडून मिळाली आहे. सद्या पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: पर्ये मतदार (Parye constituency) संघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या (Honda Panchayat) वतीने सुमारे वीस लाख खर्चून उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणी सरपंच आत्मा गावकर (Atma Gavkar) यांच्या हस्ते आज भुईपाल सालेली सीमेवर असलेल्या पंचायत मालकीच्या बागायती मधील एका कोपऱ्यात करण्यात आली. यामुळे होंडा पंचायत क्षेत्रातील कचरा (Garbage) विल्हेवाट लावण्यासाठी फार सोयीस्कर होणार असल्याने होंडा पंचायत कचरा व्यवस्थापनासाठी स्वयंपूर्ण बनणार आहे.

आजच्या काळात संपूर्ण राज्यात कचरा विल्हेवाट लावण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे, त्याच प्रमाणे येणाऱ्या काळात सदर कचऱ्या संबंधी योग्य पाऊले न उचल्यास ही समस्या आणखीनच जटील बनण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने होंडा पंचायत क्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची योजना मार्गी लावण्यासाठी पंचायत मंडळाने पुढाकार घेऊन आपल्या मालकीच्या जागेत एम आर एफ योजने अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे होंडा पंचायत क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोपे होणार आहे.

या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामांचा खर्च पंचायत फंडातून करणार असल्याची माहिती पंचायत सुत्रांकडून मिळाली आहे. सद्या पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे, त्यामुळे सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची फार मोठी समस्या होती, परंतू या प्रकल्पाचे काम मार्गी लागल्या नंतर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सरपंच आत्मा गावकर यांनी दिली.

सदर पायाभरणी कार्यक्रमाला उपसरपंच शशीकला राणे, पंच निधी गावकर, प्रतिक्षा गावडे, सया पावणे, विक्रांत देसाई, पंचायत सचिव शभांजी देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT