Home for Poor Lady in Bicholim Dainik Gomantak
गोवा

पिळगावातील गरीब महिलेला मिळाला ‘निवारा’

डिचोली रोटरी क्लबकडून बांधलेल्या घराचे हस्तांतरण

दैनिक गोमन्तक

डिचोली : पिळगाव येथील नीलिमा नरेश फाळकर या गरीब विधवा महिलेला आता हक्काचा निवारा मिळाला आहे. शिक्षण आदी क्षेत्रात सदैव कार्यरत असलेल्या डिचोली रोटरी क्लबकडून सामाजिक कार्याची बांधिलकी जोपासत ''गृहहीनांना घर'' या उपक्रमांतर्गत या महिलेला घर बांधून देण्यात आले असून, बुधवारी (23) रोटरी क्लबाच्या संस्थापक दिनाचे औचित्य साधून हे घर या महिलेच्या स्वाधीन करण्यात आले. (Home for Poor Lady in Bicholim News Updates)

साडेतीन लाखांहून अधिक रुपये खर्चून हे घर बांधण्यात आले आहे. रोटरी क्लबने आत्तापर्यंत पिळगाव पंचायत क्षेत्रात चार मिळून डिचोली (Bicholim) रोटरी क्लबने तालुक्यातील 20 गरीब कुटुंबांना घरे बांधून दिली आहेत. नीलिमा फाळकर या महिलेला स्वतःचा हक्काचा निवारा मिळावा. यासाठी पिळगाव पंचायतीच्या उपसरपंच उर्मिला प्रभू गावकर आणि त्यांचे पती उमाकांत प्रभूगावकर तसेच जयदेव प्रभू गावकर यांनी पुढाकार घेतला होता. मित्र भोसले यांच्या मदतीने तर उमाकांत प्रभूगावकर यांनी रोटरी क्लबकडे घराचा प्रस्ताव दिला होता. बुधवारी आयोजित एका सोहळ्यात रोटरीचे प्रांतपाल गौरीश धोंड यांच्या हस्ते निलम फाळकर यांच्याकडे घराच्या चाव्या देण्यात आल्या.

सात वर्षापूर्वी एका दुर्घटनेत वीज कोसळून निलम हिचे पती नरेश फाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. तेव्हापासून नीलिमा ही काजू कारखान्यावर कामाला जाऊन आपल्या तीन मुलांचा सांभाळ करीत आहे. त्यातच दोन मुलांची मानसिक स्थितीही कमकुवत आहे. निवाऱ्यासाठी स्वतःचे घर नसल्याने गावातीलच हरिश्चंद्र रघुवीर साळगावकर यांनी तिला निवाऱ्यासाठी आपली जागा दिले. तेव्हापासून नीलिमा आपल्या मुलांसोबत त्याठिकाणी राहत होती. रोटरीच्या आधारातून हक्काचा निवारा (Home) मिळाल्याने नीलिमा फाळकर हिच्या चेहऱ्यावर तर आनंदाश्रू दिसून येत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT