Goa Beach Party : Ashwem And Mandrem Beach Dainik Gomantak
गोवा

Ashwem And Mandrem Beach: आश्‍‍वे-मांद्रे किनारी भागात ‘होळीच्या पार्ट्या’ उधळल्‍या

होळीच्या तिसऱ्याही दिवशीही किनारी भागातील काही क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये कर्णकर्कश आवाजात संगीत पार्ट्या आयोजित केल्या होत्या

गोमन्तक डिजिटल टीम

Ashwem And Mandrem Beach Holi Party 2023: जागतिक महिलादिन, होळी आणि त्‍यानंतर धुलिवंदन या पार्श्वभूमीवर दोन दिवस काही ठिकाणी संगीत रजनींना मुभा होती. परंतु होळीच्या तिसऱ्याही दिवशीही किनारी भागातील काही क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये कर्णकर्कश आवाजात संगीत पार्ट्या आयोजित केल्या होत्या.

‘होळीच्या पार्ट्या’ म्हणून ठिकठिकाणी फलक लावण्‍यात आले होते. त्‍यातील बेकायदा पार्ट्या मांद्रे पंचायतीने उधळून लावल्‍या.

या पार्ट्यांसाठी काही जणांनी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत तर काहींनी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत परवाने घेतले होते. काहींनी तर परवानेच घेतले नव्हते.

आश्वे-मांद्रे किनारी भागात एका बाजूने वाहतुकीची कोंडी तर दुसऱ्या बाजूने होळीच्या नावावर तिसऱ्याही दिवशी बेकायदा पार्ट्यांचे आयोजन करण्‍यात आले होते.

मांद्रे सरपंच ॲड. अमित सावंत यांच्या लक्षात ही बाब आल्‍यावर त्‍यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ‘तुमच्याकडे परवाने नसतील तर पार्ट्या बंद करा’, अन्यथा तुमच्यावर पंचायतीमार्फत कडक कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा दिला. त्‍यानंतर काही जणांनी पार्ट्या बंद केल्या, तर काही पार्ट्या सुरूच होत्या.

एका क्लबला चक्क महिनाभराचे परवाने

आश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत तब्बल एका महिन्याचे परवाने दिले गेले. हा जो सावळा गोंधळ सुरू आहे त्‍याबद्दल मांद्रे सरपंच अमित सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

अशा प्रकारचे परवाने नियमात बसतात की काय, याची चौकशी करण्याची मागणी त्‍यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT