Holi Celebration Dainik Gomantak
गोवा

हरमल येथे होळी उत्सव उत्साहात

हरमलच्या मासळी मार्केटमध्ये लोकांनी मासे, मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी केली होती.

दैनिक गोमन्तक

हरमल: येथील खालचावाडा भागात पर्यटनस्थळ असल्याने स्थानिक युवकांनी एकमेकांना रंग लावून होळी उत्सव उत्साहात साजरा केला. त्यांच्याबरोबरीने विदेशी पर्यटकही ‘फेस्टिव्हल ऑफ कलर’मध्ये सामील झाले होते.

यावेळी हरमलचे पंच प्रवीण वायंगणकर, दामोदर नाईक व हरेश मयेकर उपस्थित होते. हरमलात होळी उत्सवानिमित्त 9 दिवस धुळवड साजरी करतात. हरमलच्या मासळी मार्केटमध्ये लोकांनी मासे, मटण व चिकन खरेदीसाठी गर्दी केली होती.

डिचोलीत बालगोपाळांचा उत्साह

ढोल-ताशांचा गजर आणि संगीताच्या तालाचा ठेका धरून एकमेकांवर गुलाल उधळीत डिचोलीतील विविध भागात रंगपंचमी अर्थातच होलीकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डिचोली शहरासह विर्डी, सर्वण आदी काही ठिकाणी लहान मुलांसमवेत महिलांही या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. ‘कोविड’मुळे गेल्यावर्षी रंगपंचमीचा मोठासा उत्साह दिसून आला नव्हता.

यंदा मात्र सर्वत्र या उत्सवात शिमग्याचा उत्साह दिसून येत होता. दरम्यान, नोकरी धंद्यानिमित्त डिचोली शहरात वास्तव्य करून राहणारे गोव्याबाहेरील विशेष करून कन्नडीगांतर्फे रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाही कन्नडीगांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. एकमेकांना होळीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT