CCTV  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील ऐतिहासिक वास्तू येणार CCTV च्या कक्षेत: पुरातत्व संचालनालय

सध्या संचालनालयाने स्मारकांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: ऐतिहासिक वास्तूंचे विद्रुपीकरण आणि त्यांच्या परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी, पुरातत्व संचालनालय (Directorate of Archives and Archaeology) 51 ठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्याचा विचार करत आहे. (historical monuments in Goa to come under CCTV surveillance)

सध्या संचालनालयाने स्मारकांवर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. गोवा मानव संसाधन विकास महामंडळ (GHRDC) मार्फत ही नियुक्ती करण्यात आली आहे. स्मारकांचे विद्रुपीकरण आणि देखभालीच्या अभावामुळे गोव्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ वरद सबनीस म्हणाले की, स्मारकांचे विद्रुपीकरण तसेच त्यांच्या परिसरात अतिक्रमण होत असल्याची बाब संचालनालयाच्या लक्षात आली आहे. या स्थळांवर सुरक्षा वाढवण्याची आणि स्मारकांची दैनंदिन देखभाल करण्याची गरज होती. यामुळे आम्हाला त्या ठिकाणी स्वच्छता राखण्यातही मदत होईल," असे ते म्हणाले.

सबनीस पुढे म्हणाले की, सध्या सुरक्षा रक्षक आणि युटिलिटी अटेंडंटची ड्युटी सकाळ ते संध्याकाळ आहे आणि लवकरच आम्ही ती चोवीस तास करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT