Bank |ATM Security Dainik Gomantak
गोवा

ATM Security: ‘एटीएम’ मशीन सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमा

बँक एटीएम मशीनशी संबंधित चोरी प्रकार टाळण्यासाठी एटीएम मशीनवर सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची विनंती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी केली.

दैनिक गोमन्तक

ATM Security: बँक एटीएम मशीनशी संबंधित चोरी प्रकार टाळण्यासह सार्वजनिक पैशांची लूट होऊ नये, यासाठी एटीएम मशीनवर सुरक्षारक्षक नियुक्त करण्याची विनंती पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी केली. म्हापसा पोलिस विभागीय क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत दळवी हे बोलत होते.

यावेळी पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक, प्रशल नाईक देसाई, उपनिरीक्षक आशिष पोरोब व सहकारी पोलिस उपस्थित होते.

या बैठकीत युको, कर्नाटक, जी. पी. पारसिक, साऊथ इंडियन, आयडीबीआय, बडोदा, एचडीएफसी, महाराष्ट्र, कोटक महिंद्रा, एनकेजीएसबी, टीजेएसबी, भारतीय स्टेट, बँक ऑफ इंडिया, डीसीबी, इंडसइंड, सेंट्रल, कॅथोलिकसिरीयन, युनियन, यूबीआय या बँकांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.

बहुतेक एटीएम मशीनस्थळी बँकांकडून सुरक्षारक्षक तैनात केले नसल्याचे आढळून आल्यामुळे वरील सूचना पोलिसांनी केली आहे.

एटीएमच्या आवारात ‘सीसीटीव्ही’चे जाळे उभारावे, जेणेकरून चोरीचे प्रकाराचा तपास लावण्यास मदत होईल. या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बँक अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देण्याची विनंती उपअधीक्षक दळवी यांनी केली. बँक अधिकाऱ्यांनी यावेळी आपला अनुभव सांगितला. ही बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या निर्देशानुसार उपमहानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी बँक अधिकाऱ्यांना अन्य सुरक्षासंबंधी भेडसावणाऱ्या समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.

बँक, पोलिसांचा व्हॉटस्‌ॲप समूह

एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक नियुक्ती करण्यासंदर्भात एका अधिकाऱ्यांनी पोलिसांनी तशा आशयाचे पत्र पाठवण्याची सूचना केली. त्यानुसार लगेच बैठकीवेळीच हे पत्र बँक अधिकाऱ्यांना देण्यात आले. याशिवाय सर्व बँकांचा समावेश असलेला पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला.

एटीएमवर एक रजिस्टर ठेवण्याची सूचना केली. जेणेकरून गस्तीवरील पोलिस रोज भेट देऊन सदर नोंद वहीवर शेरा मारतील,असेही बैठकीत सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT