Environmental concerns over POP Ganesh idols raised in Goa Dainik Gomantak
गोवा

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

Ban POP Ganesh Idol In Goa: शासनाने बंदी लागू केलेली असतानाही इतर राज्यांतून आयात केलेल्या मूर्तींची विक्री सुरू असल्याचे समितीने म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: गोवा राज्य प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपासून मुक्त करण्यासाठी शासनाने या बंदीचे प्रभावीपणे आणि तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.

याबाबतचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी कु. एगना क्लीटस, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकीत यादव, म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी वर्षा परब, फोंडा येथील उपजिल्हाधिकारी शुभंम नाईक, डिचोली येथील उपजिल्हाधिकारी नेहाल तळवणेकर यांच्याकडे देण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून गोवा राज्यात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या आयात व विक्री यांवर शासनाने बंदी लागू केलेली असतानाही इतर राज्यांतून आयात केलेल्या मूर्तींची विक्री सुरू असल्याचे समितीने म्हटले आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा प्रसार करणे, शाडू मातीच्या मूर्ती तयार करणार्‍या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबवणे, गणेशोत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात व्हावे यासाठी काळजी घेणे, अशा मागण्या समितीने निवेदनाच्या माध्यमातून केल्या आहेत.

तसेच प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची आयात व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, उत्पादन शुल्क विभाग, व्यावसायिक कर विभाग व पोलीस यांचा समावेश असलेल्या विशेष कृतीदलाची स्थापना करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी हिंदू जनजागजृती समितीच्या म्हापसा येथील शिष्टमंडळात ‘शिवराज्य प्रतिष्ठान’चे गोविंद गोवेकर, ‘हिंदु युवा शक्ती’चे सुजन नाईक, ‘स्वराज्य गोमंतक’चे सिद्धार्थ मांद्रेकर, म्हापसा व्यापारी संघटनेचे जितेंद्र फळारी, ‘शिव छत्रपती युवा मंडळ ट्रस्ट’ आणि ‘कलकी मानव सेवा समिती, गोवा’ यांचे प्रतिनिधी, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत पंडित आणि सचिव जयेश थळी, सनातन संस्थेच्या शुभा सावंत, हिंदु जनजागृती समितीच्या हेमश्री गडेकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 Cricket: 19 वर्षांच्या पोरानं उडवली कांगारुंची झोप! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात घडवला इतिहास; नावावर केला मोठा रेकॉर्ड!

Cyber Fraud: सारवी, कविता, दिनाज, जास्मिन... चौघींच्या प्रेमात 80 वर्षीय मुंबईकर कंगाल, 9 कोटींना घातला गंडा

Viral Video: अजब फॅशन! महिलेने जिवंत बेडकाचे बनवले 'नेकलेस', व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण; तुम्ही पाहिलाय का?

IND vs AUS: भारताचा 'क्लीन स्वीप'! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात शेफालीची खेळी ठरली व्यर्थ; कांगारुंनी मारली बाजी

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या क्रूर कृत्याने हादरले उत्तराखंड

SCROLL FOR NEXT