High Tide Alert in Goa Dainik Gomantak
गोवा

High Tide Alert in Goa: गोव्यात मंगळवारपर्यंत हायटाईडचा इशारा; लहान बोटी समुद्रात न नेण्याचे आवाहन

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सर्व्हिसेसचा इशारा

गोमंतक ऑनलाईन टीम

High Tide Alert in Goa: बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनला गतीमान केले. त्यामुळे केरळमधून विक्रमी तीन दिवसातच मॉन्सूनने गोव्यात प्रवेश केला. एरवी मॉन्सूनला केरळमधून गोव्यापर्यंत यायला पाच दिवसांचा तरी कालावधी लागतो.

तथापि, बिपरजॉय वादळामुळे मॉन्सूनची वेगाने प्रगती झाल्याबरोबरच समुद्रही खवळलेला आहे. त्यामुळेच गोव्यात मंगळवारपर्यंत हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे.

इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सर्व्हिसेसने याबाबत गोव्यातील किनारपट्टीवरील नागरिकांना इशारा दिला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम पुढील काही काळही जाणवत राहणार आहे. त्यामुळेच गोव्यात मंगळवारपर्यंत हाय टाईडची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, संस्थेने छोट्या बोटी समुद्रात नेऊ नयेत, असे म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकदेखील जारी करण्यात आले आहेत. नागरिक, पर्यटकांना समुद्रात न जाण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT