Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Goa Fruit Market: मार्गशिर्ष सुरू होताच फळं महागली, वाचा डिचोलीतील पंचफळांचा दर काय?

Mahalakshmi Festival In Goa: मार्गशिर्ष महिना एक पवित्र आणि सुवासिनींसाठी आनंददायी महिना. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी घरोघरी सुवासिनी देवी महालक्ष्मीचे व्रत पाळतात.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: मार्गशिर्ष महिना एक पवित्र आणि सुवासिनींसाठी आनंददायी महिना. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी घरोघरी सुवासिनी देवी महालक्ष्मीचे व्रत पाळतात. गुरुवारी (ता.५) मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने आज डिचोलीचा (Bicholim) आठवडी बाजार व्रतासाठी लागणाऱ्या वस्तूंनी फुलून गेला होता.

देवी महालक्ष्मीच्या रेडिमेड मूर्तींसह फळाफुलांची खरेदी जोरात सुरू होती. यामुळे पहिल्या गुरुवारच्या पूर्वदिनी बाजारात फळांसह फुलांना तेजी आली होती. सायंकाळी तर फळांच्या खरेदीला जोर आला होता. एकाच दिवशी डिचोलीत फळ (Fruits) आणि फूल विक्रीतून दोन लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. फळांना प्रचंड मागणी असतानाही, दर मात्र स्थिर होते. केळी ८० रुपये प्रतिकिलो, सफरचंद २०० ते २५० रुपये, मोसंबी २०० रुपये, डाळींब २०० रुपये प्रतिकिलो असे फळांचे दर होते. पंचफळांना मात्र तेजी आली होती. १०० ते १५० रुपये पंचफळांचा सेट, याप्रमाणे फळे विकण्यात येत होती.

फुलांना मागणी वाढली

महालक्ष्मी व्रताचे महत्त्व लक्षात घेऊन देवीच्या साजशृंगार केलेल्या रेडिमेड मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. काही दुकानदारांनी या मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. १०० ते ४०० रुपये मूर्ती असे दर आहेत. या रेडिमेड मूर्तींनाही बाजारात मागणी होती. फुलांनाही मागणी होती. त्यामुळे फुले महाग झाली होती. सायंकाळी तर बाजारातून फुले गायब झाली होती. बहुतेक सुवासिनींनी महालक्ष्मी व्रतासाठी लागणारे साहित्य खरेदी केले असून, व्रतासाठी सुवासिनी सज्ज झाल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 WC 2026: आफ्रिकेचा 'विजयी षटकार'! वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत सेमीफायनलचं तिकीट केलं पक्क; मार्करमची तुफानी खेळी ठरली निर्णायक VIDEO

Shirgao Lairai Jatra: ''6 मार्चपर्यंत क्राउड मॅनेजमेंट प्लॅन सादर करा'', शिरगाव जत्रेबाबत हायकोर्टाचा कडक आदेश; चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सरकारला अल्टिमेटम

Budh Vakri 2026: 23 दिवसांचा 'राजयोग'! बुधाची वक्री चाल पालटणार 'या' 3 राशींचं आयुष्य; 21 मार्चपर्यंत बरसणार पैशांचा पाऊस

Goa Crime: मायणा-कुडतरीत खळबळ! फूस लावून पळवून अल्पवयीन मुलीचं अपहरण, संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; पालकांचा गंभीर आरोप

Operation Sindhur 2.0: 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ने उडणार पाकड्यांचा थरकाप, भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचा थेट इशारा; शत्रूच्या छाताडावर नाचणार 'भैरव' सैन्य! VIDEO

SCROLL FOR NEXT