High Court Dainik Gomantak
गोवा

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Nightclub fire tragedy: न्यायालयाने सरकारला अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून यंत्रणा निश्चित करण्यासाठी व असे घडल्यास कोणाला जबाबदार ठरवावे, याचे उत्तर मागितले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: 'बर्च बाय रोमियो लेन'मध्ये आग लागून झालेल्या भीषण दुर्घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली आहे. या दुर्घटनेच्या निमित्ताने न्यायालयाने राज्यात फोफावलेली बेकायदेशीर बांधकामे आणि नियमबाह्य व्यावसायिक उपक्रमांवर तीव्र ताशेरे ओढले असून, आता राज्यातील अशी सर्व बांधकामे उच्च न्यायालयाच्या रडारवर आली आहेत.

न्यायालयाने सरकारला अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून यंत्रणा निश्चित करण्यासाठी व असे घडल्यास कोणाला जबाबदार ठरवावे, याचे उत्तर मागितले आहे. न्यायालयाने अॅड. रोहित ब्रास डीसा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. आज रोमियो लेन बेकायदेशीर असल्याबद्दल याचिका न्यायालयात दाखल केली होती.

यावरील युक्तिवादादरम्यान, हा विषय केवळ एका बांधकामापुरता मर्यादित नसून, त्याचे स्वरूप खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे, हे न्यायालयाला जाणवले. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेला स्वेच्छा याचिकेला टॅग करत, या व्यापक विषयाची दखल घेतली. उच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार या समस्येचे मूळ हे बेकायदा बांधकामांमध्ये आहे. स्थानिक स्वराज संस्थांना बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे अधिकार असतानाही, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई झाली नाही.

याहून गंभीर बाच म्हणजे, काही बेकायदेशीर बांधकामांना चक्क व्यावसायिक परवाने देखील मंजूर करण्यात आले आहेत. पाडकामाचे आदेश होऊनही अनेक बांधकामे केवळ तात्पुरती स्थगिती मिळवून आपला व्यावसाय सुरू ठेवतात. याला न्यायालयाने गंभीर प्रशासकीय अपयश मानून आणि म्हणूनच न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने बेकायदा बांधकामांसंबंधी सरकारला जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि नियमबाह्य परवानग्यांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या स्वेच्छा हस्तक्षेपामुळे आता राज्यातील सर्व बेकायदेशीर बांधकामे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा न्यायालयाच्या कठोर नजरेखाली आल्या आहेत.

लुथरा बंधूंना उद्या भारतात आणण्याची शक्यता

हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण अगीत २५ जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणातील फरार मालक सौरभ व गौरव लुथरा यांना मंगळवारी गोव्यात आणले जाण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुथरा बंधू मंगळवारी सकाळी दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यानंतर ट्रान्झिट रिमांड मिळवून त्यांना पुढील तपासासाठी गोव्यात आणण्यात येणार आहे. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयचे पथक थायलंडमधील फुकेत येथे गेले होते.

भारत सरकारने त्यांचे भारतीय पासपोर्ट निलंबित केल्याने, थायलंडमधील भारतीय दूतावासाने त्यांना इमर्जन्सी सर्टिफिकेट्स (एकतर्फी प्रवास कागदपत्रे) जारी केली असून, त्याद्वारे त्यांचा भारतात परतण्याचा प्रवास सुलभ झाला आहे

चौकशी समितीला आठवड्याची मुदतवाढ

'बर्च बाय रोमिओ लेन' क्लबला लागलेल्या आगीची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दंडाधिकारी समितीला आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. चौकशीतून काय समोर येते, याकडे सान्यांचे लक्ष लागले आहे.

नाईट लाईफ रात्री 12 नंतर नकोच: राणे

'नाईट लाईफ रात्री १२ नंतर नकोच, अशी भूमिका मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली आहे. 'राज्यातील युवकांना व्यसनांपासून मुक्त करूया, गोव्याला आध्यात्मिक पर्यटकाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करूया, असे त्यांनी मत मांडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

Goa Today News Live: लुथरा बंधु थायलंडमधून डिपोर्ट; दिल्लीत दाखल झाल्यानंतर गोवा पोलिस दोघांना घेणार ताब्यात

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 'ड्राय रन' सराव, धुक्यामुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययासंदर्भात भागधारकांशी ऑपरेशनल तयारीबाबत चर्चा

IPL 2026: 66 दिवस, 84 सामने... 'आयपीएल 2026'चा थरार 'या' तारखेपासून, फायनलची तारीखही जाहीर

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT