High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News: इस्कॉन मंदिराच्या रस्ता बांधकामाला स्थगिती; खंडपीठाचा सरकारला दणका

पुढील आदेशापर्यंत कंत्राटदाराला बिले न देण्याचे निर्देश

दैनिक गोमन्तक

बोरी येथे डोंगर माथ्यावरील इस्कॉन मंदिरासाठी सरकारी खर्चाने सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती देत सरकारला दणका दिला. या रस्त्याच्या विरोधात बोरीवासीयांची तसेच पर्यावरणासंदर्भात अभिजीत प्रभुदेसाई यांची मिळून दोन याचिका गोवा खंडपीठाने दाखल करून घेतल्या आहेत.

पुढील आदेशापर्यंत या रस्त्याच्या कामाची बिले कंत्राटदाराला देऊ नयेत, असेही निर्देश देत सरकारची कोंडी केली आहे. ही सुनावणी ८ जानेवारीला ठेवली आहे.

इस्कॉन मंदिरासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्चून सरकार बांधत असलेल्या रस्त्याच्या बांधकामासंदर्भातील याचिकांवर गोवा खंडपीठाने प्राधान्यक्रमाने सुनावणी पूर्ण करून निवाडा राखून ठेवला होता.

सरकारने या मंदिराकडे जाण्यासाठी डोंगराळ भागातील झाडे कापून तसेच खोदकाम करून रस्त्याचे बांधकाम सुरू केले होते, त्यालाच स्थगिती दिली आहे.

सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी या रस्त्याचे काम पर्यावरण आघात मूल्यांकन करूनच सुरू केल्याचे सांगितले.

म्हणून दिली स्थगिती

एखाद्या खासगी संस्थेच्या रस्ता बांधकामासाठी बोरी कोमुनिदादने दिलेला ना हरकत दाखला कोमुनिदाद संहितेच्या नियमांनुसार नसल्याचा दावा दिलीप नाईक व इतर ९ जणांनी याचिकेत केला.

तसेच रस्ता बांधकामाचा परिसर डोंगराळ व उतरणीचा असल्याचा अभिजीत प्रभुदेसाई यांनी केलेला दावा खंडपीठाने उचलून धरला. त्यामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली.

पर्यावरणप्रेमींनी नोंदवलेले आक्षेप

  • मंदिरासाठी बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचा भाग डोंगराळ आणि उतरणीचा आहे.

  • या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे आहेत.

  • या रस्त्यासाठी काही झाडेही तोडली आहेत.

  • खासगी संस्थेच्या मंदिरासाठी पर्यावरण नष्ट करून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.

  • रस्त्यासाठी जमिनीच्या रूपांतरासाठी सनद घेतलेली नाही.

  • बोरी कोमुनिदादने बनवेगिरी करून ‘ना हरकत’ परवाना दिला.

  • त्यामुळे जलस्रोत, कृषी, वन्यजीव, पर्यावरणाचे नुकसान.

  • कामासाठी नियम धाब्यावर बसवून शहर व नगर नियोजन तसेच पंचायत परवाना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT