High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

Anjuna Panchayat: हणजूणच्या सरपंच व पंचांना नोटीस; कारवाई न केल्याने गंभीर दखल

बांधकामाविरुद्ध मंडळाचा परवाना नसतानाही कारवाई केली नव्हती

दैनिक गोमन्तक

High Court of Bombay at Goa: हणजूण - कायसूव पंचायतीने ‘ना विकास क्षेत्रातील’ आस्थापनांविरुद्ध कारवाई करताना पंचायतीचे सरपंच व एका महिला पंच सदस्याच्या बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध कारवाई न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गंभीर दखल घेत सरपंच व पंच सदस्यांना नोटीस बजावली आहे.

येत्या बुधवारपर्यंत त्यांना स्पष्टीकरण देण्याचे व ही आस्थापने सील करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा व्यवसाय करण्याचा परवाना नाही. त्यांची आस्थापने सील करण्याचे निर्देश दिले होते. अशा 275 आस्थापनांपैकी 100 आस्थापने सील करण्यात आली होती, तर १७५ जणांना कारणेदाखवा नोटीस बजावली होती.

‘त्यां’च्याविरुद्ध कारवाई झालीच नाही

हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर आस्थापनांविरुद्ध उच्च न्यायालयाने स्वेच्छा जनहित याचिका घेतली होती.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पंचायतीने कारवाई करताना सरपंच व एका महिला पंच सदस्याच्या बांधकामाविरुद्ध मंडळाचा परवाना नसतानाही कारवाई केली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT