High Court of Bombay at Goa Dainik Gomantak
गोवा

High Court of Bombay at Goa: ‘अमारी बाय शी’ला दणका; खंडपीठाचा आदेश

हॉटेल 24 तासांत बंद करा!

दैनिक गोमन्तक डिजिटल

High Court of Bombay at Goa: कळंगुट येथे लाकडाचा वापर करून नव्याने उभारलेल्या ‘अमारी बाय शी’ या रिसॉर्टकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अग्निशमन दलाचा परवाना नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हे रिसॉर्ट 24 तासांत बंद ठेवण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणी 29 मार्चला ठेवली आहे.

गोवा फाऊंडेशनने या रिसॉर्टचे बांधकाम व व्यापार परवान्याला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या आदेशामुळे रिसॉर्ट बंद ठेवावे लागल्याने मालकाला चांगलाच दणका बसला आहे.

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (जीसीझेडएमए) या रिसॉर्टला 200 मीटरच्या ना विकास क्षेत्रात (एनडीझेड) बांधकाम कऱण्यास तात्पुरता ना हरकत दाखला दिला असून त्याच्या आधारे पंचायतीने येथे लाकडी कुटीरे तसेच हॉटेल व्यवसायासाठी व्यापार परवाना दिला आहे.

हे बांधकाम तात्पुरत्या सामानाचे असावे, अशी अट या परवान्यात असतानाही संपूर्ण रिसॉर्ट हे जलतरण तलावासह कायमस्वरूपी बांधकामाच्या पायावर उभारले आहे.

फक्त तळमजला असणे आवश्‍यक असतानाही रिसॉर्टने एकमजला असलेले रेस्टॉरंट उभारले आहे. या रिसॉर्टने परवान्यात घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचे याचिकेद्वारे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

परवाने नसताना बांधकाम

या बांधकामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व अग्निशमन दलाकडून परवाने घेतले नसल्याचे उघडकीस आल्याने या याचिकेवरील सुनावणीवेळी खंडपीठाने रिसॉर्टच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त करत सर्व परवाने नसताना तेथे हॉटेल व्यवसाय कसा सुरू केला, असा प्रश्‍न करत ते त्वरित 24 तासांत बंद करण्याची आवश्‍यकता आहे, असे सुनावले.

यावेळी रिसॉर्टच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आपल्या अशिलाला विचारून घेऊन ते बंद केले जाईल, अशी हमी खंडपीठाला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT