Vijay Sardesai 
गोवा

Goa Monsoon Aid : घर पडून निधन झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत : विजय सरदेसाई

Help for flood victims in Goa : त्यांना घरापर्यंत येण्यासाठी रस्ता नाही. तरी त्यांना पायऱ्या बांधून दिल्या जातील व जी धोकादायक झाडे आहेत ती कापली जातील, असेही त्यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी, ताळसांझर, आके, मडगाव येथे काही दिवसांपूर्वी घर कोसळून निधन झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे ४ लाख रुपये देण्यात येतील, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी जिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकऱ्यांसमवेत शनिवारी या भागाची पाहणी केल्यानंतर सांगितले.

त्या कुटुंबाला घर बांधून दिले जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

ताळसांझर भागात अनेक मातीची घरे आहेत व ही घरे मूळ गोंयकारांची आहेत. त्यांना घरापर्यंत येण्यासाठी रस्ता नाही. तरी त्यांना पायऱ्या बांधून दिल्या जातील व जी धोकादायक झाडे आहेत ती कापली जातील, असेही त्यांनी सांगितले.

स्थानिक नगरसेविका निमिशा फालेरो धोकादायक झाडांची निवड करून जिल्हा प्रशासनाला त्याबद्दल कळविणार आहेत. ताळसांझर परिसर हा मडगाव कोमुनिदादच्या मालकीचा असून त्यात दीडशेपेक्षा जास्त बेकायदा घरे असल्याचे कोमुनिदादचे ॲटर्नी सेलेस्टीन नोरोन्हा यांचे म्हणणे आहे.

ही घरे पाडण्यासाठी कोमुनिदादने आदेश दिले असले तरी सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ही सर्व घरे धोकादायक स्थितीत असून त्यातून काहीही बरेवाईट होऊ शकते. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नोरोन्हा यांचे म्हणणे आहे.

कही लोकांनी इथे बेकायदेशीर घरे बांधून ती भाड्याने दिली आहेत. पालिकेने याचीही दखल घेणे आवश्यक असल्याचे नोरोन्हा यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

ED Raid: 155 कोटींचा बँक घोटाळा अन् 'ईडी'चा थेट गोव्यात छापा! 'या' बड्या कंपनीवरील कारवाईने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT