Goa Weather Update | Goa Rain Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: राज्यात 18 व 19 जूनला मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाची शक्यता

हवामान खात्याने याकाळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Rain Update : राज्यात 18 व 19 जूनला मेघगर्जनेसह मुसळधार पाऊसाची शक्यता गोवा हवामान विभागाने वर्तविली आहे. याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. राज्यातील काही ठिकाणी 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) ने व्यक्त केलेल्या अंदाजात म्हटले आहे की, 18 ते 20 जून दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व विजांचा कडकडाटासह 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

21 ते 22 जून दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने याकाळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळ होत असताना खुल्या जागेत आणि शेतात काम करणे टाळा तसेच उंच झाडे आणि उंच मनोऱ्यांखाली आश्रय घेणे टाळा.

विजा आणि सोसाट्याचा वारा असताना विजेचे खांब आणि कमकुवत संरचनांपासून दूर राहा. विद्युत उपकरणे वापरणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

हेरिटेज संरक्षणात विलंब भोवणार, केंद्रीय प्राधिकरणावर कोर्टाची नाराजी; अधिकाऱ्यांनाही इशारा

खरी कुजबुज: भाजपाला उशिरा आलेली जाग!

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर Tax किती? ग्रॉस सॅलरीपासून ITRपर्यंत समजून घ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं संपूर्ण गणित

Cyber Fraud: फेक क्राईम ब्रँच ऑफिसर, 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी अन् 42 लाखांवर डल्ला; भामट्याचा गेम ओव्हर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

SCROLL FOR NEXT