Chorla Ghat News Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat: चोर्ला घाटात कोसळले झाड! मातीचा भाग रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी; सुदैवाने जीवितहानी टळली

Chorla Ghat Road Update: चोर्लाघाट मार्ग हा बेळगावकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. झाड कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

Sameer Panditrao

वाळपई: मुसळधार पावसामुळे चोर्ला घाटात दररोज झाडे आणि दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी ४ वा.च्या सुमारास एका झाडासह मातीचा भाग रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली.

सुदैवाने झाड पडताना रस्त्यावर कोणतीही वाहने किंवा व्यक्ती नसल्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, झाडासोबत घसरून आलेली माती रस्त्यावर साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

चोर्लाघाट मार्ग हा बेळगावकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. झाड कोसळल्यानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच डिचोली वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिस सेलचे इन्चार्ज किशोर आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीच्या साहाय्याने झाड रस्त्यावरून हटवून रस्त्यावर साचलेली मातीही तातडीने हटविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT