Goa Borim Flood Dainik Gomantak
गोवा

Borim News: दुतर्फा पाणी, झाडांची पडझड; बोरीला पावसाने झोडपले

Goa Rain: मुसळधार पावसाने खाजन शेती पाण्‍याखाली

गोमन्तक डिजिटल टीम

मुसळधार पावसाने बोरी आणि शिरोडा गावाला गेल्‍या तीन दिवसांपासून झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचल्‍यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रविवार, १४ रोजी मुसळधार पावसाने वेग धरल्याने येथून वाहणाऱ्या झुवारी नदीच्या पात्राला पूर आला. शिरोडा गावातील खाजन शेतीत पाणी साठून वाहत होते. शिवनाथी तसेच वाळपे येथून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यातून तुडूंब भरून पाणी वाहत होते.

बोरी सिध्दनाथ पर्वतावरून तन्नामुळे कुडयाळ भागातून श्री नवदुर्गा तलावात नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कोपले, साकव, पेडाकडील शेतीतून आणि नाल्यातून दुतर्फा पाणी भरून वाहत होते. या दोन दिवस पडलेल्या पावसामुळे येथील कुळागरातील झाडांची पडझड झाली. अनेकांच्या घरात दुकानात पाणी शिरले.

रविवार सुट्टीचा दिवस तर सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थी व छोटी मुले सुखरूप घरी राहिली. लोटली, कामुर्ली, आंबोडा, राय, राशोल, तेंबी सारख्या भागातील खाजन शेतीत पावसाच पाणी साठून राहिल्याने शेतकऱ्यांना या दोन दिवसात शेतीची कामे करता आली नाही. लोकांनी घरात बसून राहणे पसंत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT