मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा एकदा बिघडले. कोकण रेल्वेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाले असून त्याचा परिणाम अनेक रेल्वे गाड्यांवर झाला आहे. आज कोकण रेल्वेने 3 गाड्या रद्द केल्या असून पाच रेल्वे गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आले आहेत. तर 3 गाड्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. (Heavy rain disrupted the Konkan Railway schedule once again)
या 3 गाड्या रद्द करण्यात आले आहेत तर
मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस
करमळी- मुंबई तेजस एक्स्प्रेस
मडगाव - मुंबई तेजस एक्सप्रेस
एरणाकुलम - ओका ही गाडी पनवेल मिरज लोंढा मार्गे वळवण्यात आली आहे तर लोकमान्य टिळक -त्रिवेंद्रम एक्सप्रेस मिरज मार्गे वळवण्यात आली आहे तर निजामुद्दीन -एरणाकुलम एक्सप्रेस हीही गाडी याच मार्गे वळवण्यात आली आहे. याशिवाय त्रिवेंद्रम - मुंबई एक्सप्रेस वैभववाडी येथेमडगाव मुंबई एक्सप्रेस कणकवली येथे वळवण्यात आली आहे.
एरणाकुलम - लोकमान्य टिळक दुरांतो एक्सप्रेस कुडाळ स्टेशन वरती तर चंदिगड कोचुवेली संपर्क क्रांती एक्सप्रेस वीर रेल्वे स्थानकावर तर मुंबई मडगाव एक्सप्रेस माणगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.