Margao Municipal Council Meeting Dainik Gomantak
गोवा

Margao News: कंत्राटदार मिळेना, खर्चावरून गोंधळ, बागेत कॉफी शॉप; मडगाव पालिकेची सभा ठरली वादळी

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मडगाव पालिकेच्या आज झालेल्या कौन्सिलच्या बैठकीत अनेक विषयांवरून नगराध्यक्ष व नगरसेवकांत वादावादी झाली. नगरपालिकेच्या बागेत जिथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो, तिथे कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंट सुरू करण्याचा प्रस्ताव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी ठेवला.

ही बाग पालिकेची नसून ती पालिकेला पुष्कळ वर्षांपूर्वी भेटीदाखल देण्यात आली होती. त्यामुळे बागेचा व्यवसायासाठी उपयोग केला तर त्या जागेच्या मालकाचे वारस निश्चितच विरोध करतील,अशी शक्यता नगरसेवक घनःश्याम शिरोडकर यांनी व्यक्त केली. कायदेशीर बाबी लक्षात घेऊन पुढील पाऊल उचलले जाईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

पालिका इमारत नूतनीकरणासाठी ‘जीसुडा’ने मिलिंद रामाणी या सल्लागाराची नियुक्ती केली असून त्यांनी इमारतीची पाहणी केल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. नूतनीकरण करताना एसी, लिफ्ट व इमारतीच्या सभोवताली विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्याचे त्यांना सुचित केली आहे. दिवाळी नंतर ते आराखडा सादर करतील,असेही नगराध्यक्षांनी सांगितले.खासदार निधीतून नगरपालिका क्षेत्रात ३८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

पगारासाठी रकमेची तरतूद न करता कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आल्याचे घनःश्याम शिरोडकर यांनी सांगितले. या व्यतिरिक्त हिशोब तपासनीसाची नियुक्ती करणे, जुन्या मार्केट मध्ये रस्ता रुंद करणे, कुत्र्यांच्या निवारा ३०महिन्याची बाकी रक्कम कशी फेडता येईल, उम्मीद केंद्र सुरू करणे, जुन्या बस स्थानकाचे नूतनीकरण, एम्बियंट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग स्टेशन सुरू करणे, हॉट व्हेव प्लान या व अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

तीनदा सोपो निविदा; पण कंत्राटदार येईना

सोपोर गोळा करण्यासाठी तीन वेळा निविदा काढण्यात आल्या. पण एकही कंत्राटदार पुढे आला नाही. आता रक्कम ७७ लाख वरुन ६९.३० लाख व १८टक्के जीएसटी असा बदल केला आहे. शिवाय बॅंक हमी अट शिथिल करण्यात आली आहे व कंत्राटदाराकडून दोन महिन्यांची आगाऊ रक्कम घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सोपो गोळा रक्कम कंत्राट एका वर्षासाठी असून १ नोव्हेंबर २४ ते ३१ ऑक्टोबर २५ असा कार्यकाळ असेल.

शिवजयंती खर्चावरून गोंधळ

यंदा शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. त्यासाठी पर्यटन खात्याकडून ५ लाखांचा निधी पालिकेला मिळाला होता. जयंतीसाठी नगरसेवक सिध्दांत गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. खर्चही अध्यक्षाला विश्वासात न घेता केला गेला, अशी माहिती स्वतः गडेकर यांनी दिली. केवळ दीड लाख रुपये खर्च आला व ३.५० लाख रुपये शिल्लक आहेत, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

...तर शेटकरकडून वसुली अशक्य!

नगरपालिकेचे कारकून योगेश शेटकर याने फेस्त फेरीचे १७.५० लाख रुपये गायब केले. त्यातील त्याने ३ लाख परत केले. पोलिस तक्रार करूनही ते त्याला पकडू शकलेले नाहीत. शेटकरला नोकरीवरून काढले तर रक्कम वसूल होणार नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. त्याने पीएफमधूनही पैसे काढले आहेत. केवळ १० ते ११ लाख रुपये वसूल होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक सगुण नायक म्हणाले,की शेटकर पोलिसांच्या तावडीत सापडत नाही हे मोठे आश्चर्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: खराब हवामानाचा फटका; दाबोळीवर उतरणारी पाच विमाने इतरत्र वळवली

चीनचे धाबे दणाणले! नाटो सदस्य इटलीचा भारतीय नौदलासोबत ऐतिहासिक सराव, गोव्याच्या समुद्रात सहा दिवस रंगला थरार

गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Saint Francis Xavier: सेंट फ्रान्सिस झेवियरचा केला होता ‘भारतातील महान पुरुष’ असा गौरव! पहिले टपाल तिकीट कधी?

Buimpal Accident: वळणावर गुरे आडवी आल्याने वाहनचालकाचा ताबा सुटला! भुईपाल येथे टेंपो भिंतीवर जाऊन आदळला

SCROLL FOR NEXT