Margao News: मास सुरू असतानाच चर्चवर कोसळली वीज! होली स्पिरीट चर्चच्या घुडाकडील काही भागाची पडझड

Holy Spirit Church Margao: परतीच्या पावसाचा मडगावलाही काही प्रमाणात फटका बसला, आज सायंकाळीं गडगडाटासह आलेल्या पावसात विजेच्या तडाखा येथील होली स्पिरीट चर्चला बसून वरच्या घुडाकडील काही भागाची पडझड झाली.
Lightning strikes Holy Spirit Church in Margao
Lightning strikes Holy Spirit Church in Margao Canva
Published on
Updated on

Lightning strikes Holy Spirit Church in Margao

मडगाव: परतीच्या पावसाचा मडगावलाही काही प्रमाणात फटका बसला, आज सायंकाळीं गडगडाटासह आलेल्या पावसात विजेच्या तडाखा येथील होली स्पिरीट चर्चला बसून वरच्या घुडाकडील काही भागाची पडझड झाली.

ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यावेळी चर्चमध्ये मास चालू होते. अस्कमात मोठा आवाज झाल्याने भाविक घाबरले. ते घाबरून बाहेर आले असता वरील घुडाकडील काही भागाची पडझड होऊन काही भाग कोसळून खाली पडल्याचे त्यांना दिसून आले.

Lightning strikes Holy Spirit Church in Margao
Goa Rain : परतीच्या पावसाने 'अग्निशमन'ची तारांबळ! बार्देश, डिचोली, सत्तरीत झाडांची पडझड; पिकांचेही नुकसान

मडगावमधील ही होली स्पिरीट चर्च सोळाव्या शतकात बांधली होती. स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना म्हणून या वास्तूकडे पाहिले जाते. विजेच्या तडाख्यात काही किरकोळ प्रमाणात पडझड झाली तरी सर्व भाविक चर्चमध्ये माससाठी आत असल्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com