Heat and Humidity Combination in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature: कधी ऊन तर कधी आर्द्रता! गोव्यात तापमानाच्या या विचित्र मिश्रणामुळे वातावरण बनलंय उदास

उष्णता आणि आर्द्रतापूर्ण मिश्रणामुळे वातावरणात वेगळ्याच प्रकारची उदासीनता जाणवत आहे.

दैनिक गोमन्तक

Heat and Humidity Combination in Goa: गोव्यात उष्णतेचा पारा वाढल्याने गोवेकरांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. एकीकडे कडाक्याचे ऊन तर दुसरीकडे आर्द्रता यामुळे राज्यभरात एकंदरीत उदास वातावरण पाहायला मिळत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे पणजीत शुक्रवार आणि शनिवारी कमाल तापमान 34.4C आणि 34C नोंदवले आहे. सध्या उच्च तापमान आणि आर्द्रता यांचे मिश्रण असल्यामुळे सगळीकडे अस्वस्थतेचे वातावरण बनले आहे. कमाल तापमान 34 ते 36C च्या श्रेणीत आणि आर्द्रतेचे उच्च मूल्य, व्यक्तींसाठी खूप अस्वस्थ आहे, असे मत IMD पणजी येथील शास्त्रज्ञ राजश्री व्ही. पी. एम. यांनी व्यक्त केले आहे.

फेब्रुवारी आणि मार्च 2023 या दोन सर्वात उष्ण महिन्यांनंतर गोवेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, कारण पारा बहुतेक सामान्य मर्यादेतच राहिला आहे आणि जेव्हा तो वाढला तेव्हा कमाल तापमान केवळ काही अंशी सामान्यपेक्षा जास्त होते. एप्रिलमध्ये तापमानाचा पारा 36 सेल्सिअसपर्यंत वाढल्याचे काही वेळा निदर्शनास आले. त्या तुलनेत फेब्रुवारी आणि मार्च हे महीने मागील 10 वर्षातील सर्वात उष्ण महीने होते.

गेल्या काही दिवसांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानाचा पारा 23 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्यामुळे काही प्रमाणात थंड वातावरण पाहायला मिळाले, असे IMD तर्फे सांगण्यात आले. गोव्यात असलेल्या या उष्णता आणि आर्द्रतापूर्ण मिश्रणामुळे वातावरणात वेगळ्याच प्रकारची उदासीनता जाणवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT