Silly Souls Café and Bar | Smriti Irani Dainik Gomantak
गोवा

Silly Souls Case : ‘सिली सोल्स’ परवान्यासंदर्भात आज सुनावणी

कॅफेच्या मद्य परवान्याचे नूतनीकरण एका मृत व्यक्तीच्या नावे करण्यात आल्याने या खात्याने नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी : केंद्रीयमंत्री स्मृती ईराणी यांच्या कुटुंबियांच्या आसगाव येथील सिली सोल्स बार अँड कॅफेच्या कथित बेकायदेशीर अबकारी परवान्यासंदर्भात आज (दि.22) रोजी अबकारी खात्याचे आयुक्त नारायण गाड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या कॅफेच्या मद्य परवान्याचे नूतनीकरण एका मृत व्यक्तीच्या नावे करण्यात आल्याने या खात्याने नोटीस बजावून बाजू मांडण्यास सांगितले होते.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी माहिती हक्क कायद्याखाली माहिती घेऊन या सिली सोल्स बार अँड कॅफेच्या मद्य परवान्याचे नूतनीकरण मृताच्या नावाने घेतल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अबकारी खातेही खडबडून जागे झाले होते. त्यांनी या कॅफेच्या मालकाला नोटीस बजावली आहे. कायद्यानुसार मृताच्या नावे परवान्याचे नूतनीकरण करणे हा गुन्हा आहे.

सर्व नियम धाब्यावर बसवून परवान्याचे नूतनीकरण केले होते. खात्यानेही त्याची शहानिशा न करताच तो दिला होता. त्यामुळे अबकारी आयुक्त यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे विरोधकांचे लक्ष लागून आहे.

मागील सुनावणीवेळी हा अबकारी परवाना ज्या मृत व्यक्तीच्या नावे घेण्यात आला होता, त्याच्या मुलाला बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात कॅफेच्या विस्तारीत बांधकामालाही पंचायतीने परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करून हात वर केले होते. शहर व नगर नियोजन खात्यानेही या प्रकरणी चौकशी सुरू केली होती. मात्र अजूनही या खात्याने चौकशीची माहिती उघड केलेली नाही.

\या खात्याचे मंत्री असलेले विश्‍वजित राणे यांच्याकडे महिला व बाल कल्याण खातेही आहे व त्या खात्याच्या स्मृती ईराणी केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे बेकायदेशीर कृत्यांविरोधात कडक कारवाईचे इशारे देणारे मंत्री राणे हे या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT