Vishal Golatkar Murder Case Dainik Gomantak
गोवा

Vishal Golatkar Murder Case: संशयित अमेय वळवईकरच्या, जामीन अर्जावर उद्या सुनावणी

मेरशी येथील विशाल गोलतकर याच्या खून प्रकरणातील संशयित अमेय वळवईकर याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Gangwar Vishal Golatkar Murder Case :

मेरशी येथील विशाल गोलतकर याच्या खून प्रकरणातील संशयित अमेय वळवईकर याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावरील सुनावणीवेळी अर्जदाराचे वकील अनुपस्थित राहिल्याने ती बुधवार, 23 रोजी ठेवण्यात आली आहे.

या प्रकरणातील संशयित ओंकार च्यारी याला गेल्या आठवड्यात न्यायालयाने जामीन दिल्याने आता वळवईकर याने हा अर्ज सादर केला आहे.

या प्रकरणातील इतर संशयित साई ऊर्फ कोब्रा कुंकळ्ळीकर, तुषार कुंकळ्ळीकर, गौरेश गावस व अमेय वळवईकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत तर एक बालगुन्हेगार हा मेरशी येथील अपना घरात आहे.

अमेय वळवईकर पोलीस खात्यात भरती झाला होता

अमेय वळवईकर हा गेल्या वर्षी मार्चमध्ये पोलीस खात्यात भरती झाला होता. वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्याचे प्रशिक्षण सुरू होते. अमेय हा मुख्य आरोपी कुंडईकरचा नातेवाईक आहे. ज्यावेळी विशाल गोलतकर याच्यावर हल्ला झाला तेव्हा अमेयसुद्धा कुंडईकरसोबत होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. सध्या अमेय न्यायालयीन कोठडीत असून त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

एकाच टोळीतील साथीदार एकमेकांचे शत्रू का झाले?

गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरशीतील गुंड साई ऊर्फ कोब्रा आणि विशाल हे दोघे पूर्वी एकाच गुन्हेगारी गटात होते.

नंतर त्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. विशाल साईचा तिरस्कार करू लागला. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट वाढत गेले. नंतर साईने विशालचा काटा काढण्याचे ठरवले.

त्यासाठी त्याने रात्री व्यवस्थित नियोजन केले आणि मेरशी येथे एका ठिकाणी विशालला बोलावून घेतले. त्यावेळी त्याने आपल्यासोबत ओमकार पांडुरंग च्यारी (१९), गौरेश नारायण गावस (२५) तुषार तुळशीदास कुंडईकर (३८) यांच्यासह एका अल्पवयीनाला सोबत घेऊन विशालवर धारदार शस्त्राने हल्ला केला. विशालचा खून केल्यानंतर त्यांनी तेथून दीड किलोमीटर वयलेभाट - मेरशी येथील मिनेझिस फॅक्टरीजवळच्या झुडपात त्याचा मृतदेह टाकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

8th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! 15 वर्षांची कम्युटेड पेन्शनची मुदत कमी होणार? 8व्या वेतन आयोगाकडे मोठी मागणी

Colvale jail: 'कारागृह', सुधारगृह की पंचतारांकित हाॅटेल? भिंतीआड सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाईची गरज

SCROLL FOR NEXT