Health officer attack Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: लोखंडी रॉडने अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, वार्का येथील घटना; संशयिताचा जामीन गोवा खंडपीठाने फेटाळला

Health officer attack Goa: आरोग्य अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संशयित ज्यो पेरेरा याचा अटकपूर्व जामिन अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळून लावला.

Sameer Panditrao

पणजी : आरोग्य अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संशयित ज्यो पेरेरा याचा अटकपूर्व जामिन अर्ज गोवा खंडपीठाने फेटाळून लावला. जखमांचे गांभीर्य तसेच घटनेनंतर आरोपीने कायदेशीर प्रक्रियेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांनी हा निर्णय दिला.

पेरेराविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम १०९ आणि ३०३(२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदार जोस गाल्दिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांची पत्नी लॅसिमा गाल्दिन्हो या ‘फीड मोअर’ रेस्टॉरंट, वार्का येथे आरोग्य तपासणीसाठी गेल्या असता आरोपीने लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, घटनेनंतर आरोपीने मोबाईल फोन बंद ठेवून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वारंवार शोध घेऊनही तो सापडलेला नसून, हल्ल्यात वापरलेले हत्यारही अद्याप जप्त झालेले नाही.

यापूर्वीही धमकी

सत्र न्यायालयातील आधीच्या सुनावणीदरम्यान पीडितेकडून आरोपीविरोधात धमकी व शिवीगाळ केल्याची स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आल्याचे निदर्शनास आणण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT