rafel 
गोवा

राफेल घोटाळ्यातील फाईल्सचा आरोग्यमंत्री विश्वजित राणे करणार भांडाफोड?

दैनिक गोमंतक

पणजी : भारतीय जनता पक्षाला लोकांचे होणारे हाल व कष्टांचे काहीच पडलेले नाही. केवळ लोकांच्या आजाराचा बाजार करण्याचे त्यांचे धोरण परत एकदा समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कथित कपाटात असलेल्या राफेल घोटाळ्यातील (Raphael scandal) फाईल्सचा आरोग्यमंत्री (Minister Health) विश्वजित राणे हे भांडाफोड करतील या भीतीनेच केंद्रिय गृहमंत्री (Home Minister) अमित शहा यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्‍यातील सुमारे 22 कोटी 59 लाख रुपयांच्या आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या खरेदीवरील कमिशन वाटणीत मध्यस्थी केली, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला  आहे.(Health Minister Vishwajit Rane will expose files in Rafale  scam?)

गोव्यात ऑक्सिजनअभावी लोकांचे प्राण जात असताना, त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजप नेतृत्त्‍वाकडे वेळ नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात संपूर्ण लॉकडाऊन करा, अशी लोकांची मागणी ऐकली नाही. गोव्यात आज लसींचा तुटवडा आहे, त्यावर बोलायला अमित शहा यांना वेळ नाही. कोविड लसीकरणासाठी केंद्राकडून साहाय्य देण्याबद्दल शहा काहीच बोलत नाहीत. परंतु , मोदी सरकारचे बिंग फुटेल या भीतीने राफेल फाईल्सचा आरोग्यमंत्री भांडाफोड करतील या भितीने डॉ. प्रमोद  सावंत व विश्वजित राणे यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यास केंद्रिय गृहमंत्री पुढे आले असे चोडणकर यांचे म्हणणे आहे.

गोव्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गेलेले मृत व त्यांचे नातेवाईक यांच्याप्रती केंद्रीय गृहमंत्री एक शब्द बोलले नाहीत, हे दुर्दैवी आहे. गोमंतकीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यास ते विसरले, अशी टीका करून त्यांनी म्हटले की, भाजपच्या केंद्रिय नेतृत्त्‍वाकडून गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांवर कारवाईची कोणतीच अपेक्षा नाही. केंद्रिय नेतृत्वाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून शिकणे गरजेचे आहे. गोव्यात ऑक्सिजनच्या अभावामुळे मरण आलेल्यांप्रती राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले व त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.


 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT