पणजी: कोरोना महामारीविरूध्दचे युद्ध अद्याप संपलेले नाही. गोव्यात (Goa) काही प्रमाणात कोरोना (Covid-19) परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अद्याप धोका टळलेला नाही. डेल्टा प्लसचे (Delta Plus) संकट तोंडावर आहे. मात्र गोव्यातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर फ्रंटलाईन वर्कर यांच्या सहकार्याने हेही संकट पळवून लावू,असा निर्धार आरोग्य मंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी व्यक्त केला आहे. (Health Minister Vishwajit Rane said Work of front liners will not end until Goa is liberated from Corona)
डेल्टा प्लस सारखे संकट गोव्यात येऊ शकते आणि त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य खाते सज्ज आहे. राज्यातील डॉक्टर परिचारिका आणि इतर फ्रन्टलाइन वर्करनी रात्रंदिवस निस्वार्थीपणे काम केल्यामुळेच राज्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. असेही पुढे बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
राज्यातील सरकारी इस्पितळे, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे येथील फ्रन्टलाइन वर्कर या सर्वांनी कोरोना संकट काळात केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचा गौरव करण्याचे अभियान सध्या आरोग्यमंत्र्यांनी सुरू केले आहे. त्याचा अभियानाचा एक भाग म्हणून आज बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात सुमारे सुमारे 1500 ते 1700 फ्रन्टलाइन वर्कर्स ज्यात डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांचा गौरव आरोग्यमंत्र्यांनी त्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन केला. यावेळी सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडीस, गोमेकॉ चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा व इतर मान्यवर उपस्थित होते.
चांगले काम केलेल्याना प्रोत्साहन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे . कोरोना महामारीच्या काळात हजारो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर चा गौरव त्यासाठीच आपण करत आहे. राज्यात जेवढे म्हणून कोरोना बाधित झाले त्या सर्वावर चांगल्यात चांगले उपचार करण्याचा प्रयत्न आरोग्य खात्याने केला. त्यातील हजारो बरे झाले तर काही जण मृत्युमुखी पडले. ही दुःखाची छाया गोव्यावर आहेच. असे सांगून डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले आणि कुणालाही उपचारापासून वंचित ठेवलेले नाही. यापुढेही डेल्टा प्लस चे आव्हान परतून लावण्यासाठी आरोग्य खात्याला सतर्क रहावेच लागणार आहे. असे राणे म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना महामारीचे संकट दूर करण्यासाठी आरोग्य खात्याला हवे असलेले सर्व सहकार्य केले. उपकरणे, उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत आणि त्यामुळेच कोरोनावर काही प्रमाणात मात करणे शक्य झालेले आहे. मात्र हे युद्ध अद्यापि संपलेले नाही. जोपर्यंत गोव्याला कोरोनातून पूर्णपणे मुक्ती मिळत नाही तोपर्यंत फ्रन्टलाइनर चे काम संपणार नाही. आणि त्यानुसारच आपणा सर्वाना एकजुटीने काम करायचे आहे. असेही यावेळी आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.