Dr. Ruben D'Souza Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane : आयडी रुग्णालयाचे डॉ. डिसोझा निलंबित

रुग्णांच्या तक्रारीवरून निलंबित; अधिकच्या चौकशीचे आदेश

दैनिक गोमन्तक डिजिटल

Ponda ID Hospital Dr. D'Souza Suspended: फोंडा येथील आयडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रुबेन डिसोझा यांना रुग्णांच्या तक्रारीवरून निलंबित केले आहे.

यासंबंधी अधिकच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली.

‘डॉ. डिसोझा यांच्याबाबत रुग्णांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. यामुळेच खात्याच्या संचालक डॉ. गीता काकोडकर यांना डॉ. डिसूझा यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. यासंबंधीचे फाईल अवर सचिवांकडे पाठवण्यात आली असून या प्रकरणांमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल’, असे राणे यांनी सांगितले.

भारतीय लष्करी सेवेत डॉक्टर म्हणून काम करून निवृत्त झाल्यानंतर डॉ. डिसोझा राज्य सरकारच्या फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात दीड वर्षांपूर्वी रुजू झाले होते.

शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाईकाकडे पैसे मागण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप होत आहे. यासंबंधी वरिष्ठांकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT