vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Health Facility : राज्यातील आरोग्य सुविधांबाबत राणेंकडून मोदींचे आभार

केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे राज्यात आज देशातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Health Facility : पणजी, केंद्र सरकारने केलेल्या विविध प्रकारच्या मदतीमुळे गोवा सरकार राज्यातील जनतेला सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देऊ शकले, असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील आरोग्य सुविधांच्या बाबत मंत्री राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत म्हणाले, केंद्र सरकारने वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे राज्यात आज देशातील सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा उभ्या राहिल्या आहेत.

मंत्री राणे म्हणाले, हृदयरोग, कर्करोग या क्षेत्रातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा यात समावेश आहे. गोवा सरकार मुलाच्या जन्मापूर्वीपासून महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे. राज्यातील महिला गरोदर राहिल्यापासून त्यांचे मूल एक ते दीड वर्षाचे होईपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याबरोबर मोफत उपचार दिले जातात.

यादरम्यानच्या काळात महिला आणि मुलांना सकस आहार मिळावा, याकरता न्यूट्रिशन सपोर्ट दिला जातो. त्यांची आरोग्य खाते व महिला आणि बालकल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्व प्रकारची काळजी घेतली जाते.

आज बाल रोग क्षेत्रात सरकारने विविध सुविधा उभारल्या आहेत. या सुविधांच्या मार्फत राज्यात मूल जन्माला येण्यापूर्वीपासून त्याची काळजी घेतली जाते. यासाठी डॉ. विरेन गावकर डॉ. हर्षद कामत सतत सक्रिय आहेत.

२० वर्षांपूर्वी राज्यात अनेक आरोग्य सुविधांचा अभाव होता. मग तो हृदयरोग असो किंवा महिला आणि बाल कल्याणाच्या क्षेत्रात असो. आज ती परिस्थिती राहिली नाही. आरोग्य क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन झाले असून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आज बहुतांश रोगांच्या बाबतीत अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.

याचा लाभ माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही घेतला आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सरकारने घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे, असेही मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Post Truth Politics In India: इव्हीएम, 'एसआयआर' अन् निवडणूक आयोग... विरोधकांकडून तीन प्रमुख मुद्द्यांवरून खोटा प्रचार?

ज्ञानेश कुमारांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाची प्रतिमा काळवंडली, विरोधकांवर उलटणार डाव; मोदी सरकार करणार 'खेला'

संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

SCROLL FOR NEXT