Goa Health Crisis: 2021च्या तुलनेत 2022मध्ये चिकुनगुनियाच्या रुग्णांत लक्षणीय वाढ झाली. खासकरून सासष्टीत जणू चिकुनगुनियाचे थैमान झाले होते. 2021 केवळ 12रुग्ण आढळले होते, तर 2022मध्ये ही संख्या वाढून 106 झाली.
यावर्षी संसर्ग होणार नाही, यासाठी आरोग्य संचालनालयाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती राष्ट्रीय संसर्गजन्य आजार उपक्रमाच्या गोव्यातील मुख्य अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
कर्नाटकातून रोजगारासाठी येणाऱ्या कामगारांमुळे पूर्वी काणकोणात चिकुनगुनिया हॉटस्पॉट ठरत होता. परंतु 2022 मडगावातील मोती डोंगर हॉटस्पॉट ठरला.
त्यांच्यापासून संसर्ग होऊन नावेली, कडचडे, कुडतरी, कोलवा परिसरात पसरला.योग्य उपाय केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यावर्षी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून खबरदारी म्हणून नियमित पाहणी केली जात आहे, असे डॉ. महात्मे म्हणाल्या.
लक्ष्य मजुरांवर
मलेरियाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. आरोग्य संचालनालयाने मलेरियाच्या बाबतीत लक्ष्य स्थलांतरित मजुरांवर केंद्रित केले आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामांची चाचणी केली करणे अनिवार्य आहे.
चाचणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना आरोग्य कार्ड दिले जाते. कार्डाशिवाय कामगार आढळल्यास कंत्राटदाराला दहा हजार रुपये दंड केला जाईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.