He saved 2 sibling lives by jumping into Mandovi River  Dainik Gomantak
गोवा

म्हादई नदीत उडी मारून ‘त्याने’ वाचवला दोघांचा जीव

साहिलच्या हिमतीला सलाम : बुडाल्‍याची वार्ता कळताच सुटला धावत

दशरथ मोरजकर

पर्ये : बेतकेकरवाडा नानुस (सत्तरी) येथील म्हादई नदी पात्रात वाहून गेलेल्या तीन भावांपैकी दोघांना बाहेर काढण्याचे काम येथील साहिल लाड व त्याच्या कुटुंबीयांनी केल्याने दोघांचा जीव वाचला.

तिन्ही भाऊ नदीवर आंघोळीसाठी पाण्यात उतरले हे साहिल यांची बहीण रंजना व आईंनी बघितले. त्या दोघेही नदीवर कपडे धूत होत्या. पाण्यात उतरल्यावर पाण्याच्या झोताच्या प्रवाहावर तिन्ही भाऊ वाहत असल्याचे या माय- लेकीने बघितले आणि आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर रंजना यांनी लगेच आपल्या घरी धाव घेऊन आपल्या भावाच्या कानावर ही वार्ता घातली. त्यानंतर साहिल आणि त्याचा काका सागर लाड यांनी ताबोडतोब नदी किनारी धाव घेतली. वाहून गेलेल्या मुलांची शोधाशोध सुरू केली.

काही वेळाने त्यांना रेहान शेख (वय 10) हा मुलगा पाण्यात बुडत असल्याचा दिसून आला. तेव्हा साहिलने डोहात उडी मारून त्याला वर काढले. त्यावेळेस तो मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर सागर लाड यांनी त्याला प्रथोमोपचार केले. तेव्हा साहिलने नदी पात्रात झाडीला अडकून राहिलेला तिसरा भाऊ असिफ शेख (13) याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर साहिल आणि सागरने पाण्यात बुडालेल्या मुलाचा शोध घेतला. काही वेळाने त्या मृत पावलेल्या मुलाचा (इरफान शेख) मृतदेह पाण्याबाहेर आले. या घटनेची माहिती वाळपई पोलिस व अग्निशमन दलाला मिळाल्याने त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MACT Margao: अपघातात जखमी महिलेला भरपाई द्यावी , 4.51 लाख देण्याचा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश

Goa Comunidade land: कोमुनिदादच्या जागेतून रस्ता नको, हळदोण्यातील गावकऱ्यांनी आमसभेत घेतला निर्णय

Morjim: पार्से-आगरवाडा जंक्शनवर भरतोय मजुरांचा बाजार, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

SCROLL FOR NEXT