Mumbai Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Flight: मुंबईतून गोव्यात येणारे विमान 7 तास लेट; अद्याप उड्डाण नाही, प्रवाशांचा संताप

सात तास उलटून गेले तरी विमानाने अद्याप गोव्यात येण्यासाठी उड्डाण घेतलेले नाही.

Pramod Yadav

Mumbai To Goa Flight: मुंबईमधून गोव्यात येणारे विमान तब्बल सात तास लेट झाले आहे. दुपारी तीन वाजता उड्डाण करणारे विमान अद्याप मुंबईमध्ये असून, मागील तास तासांपासून हे विमानतळावर प्रवाशी खोळंबून पडले आहेत.

स्पाईसजेट कंपनीचे (Spicejet Company) विमान मुंबईमधून गोव्यासाठी उड्डाण करणार होते. दरम्यान, दुपारी तीन वाजल्यापासून विमानाच्या वेळेत वारंवार बदल केला जात आहे. सात तास उलटून गेले तरी विमानाने अद्याप गोव्यात येण्यासाठी उड्डाण घेतलेले नाही.

(Mumbai To Goa Flight of Spicejet delayed by seven hours)

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट कंपनीचे विमान मुंबईमधून आज (शुक्रवार, दि.20) गोव्यात येणार होते. दुपारी तीन वाजता हे विमान विमानतळावरून सुटणार असे प्रवाशांना सांगितले होते. दरम्यान, प्रवासी विमानतळावर पोहोचले मात्र, विमानाचे उड्डाण झाले नाही. मागील तब्बल सात तासांपासून या विमानाचे उड्डाण खोळंबून आहे.

विमानाच्या उड्डाणासाठी उशीर का होत आहे याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. प्रवाशांनी मात्र विविध माध्यमातून कंपनी विरोधात रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. अनेकांनी ट्विटरच्या माध्यामातून कंपनीच्या व्यवस्थापनावर टीका केली आहे.

विमानाचे उड्डाण अद्याप झाले नसल्याने प्रवाशांनी मुंबई विमानतळावर आपला संताप व्यक्त केला. तसेच, कंपनीला धारेवर धरले. काही प्रवाशांनी विमान उशीरा झाल्याने ज्या सुविधा प्रवाशांना देणे अपेक्षित आहे त्या दिल्या जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, काही जणांनी कंपनीला प्रवाशांच्या वेळेची किंमत नसल्याचा देखील आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT