Having a tiger reserve is a central mandate, can Goa flout it? asks Goa Foundation Dainik Gomantak
गोवा

गोवा फाऊंडेशनचे संचालक विश्वजित राणेंवर संतापले, लढा उभारण्याचा निर्णय

'व्याघ्र प्रकल्पासाठी उभारणार लढा, मंत्र्यांनी या प्रकरणाचा अभ्यास करायला हवा'

दैनिक गोमन्तक

गोवा फाऊंडेशनचे संचालक आणि आघाडीचे वन आणि वन्यजीव कार्यकर्ते डॉ क्लॉड अल्वारिस यांनी म्हादई वन्यजीव अभयारण्यात व्याघ्र अभयारण्य घोषित करणे टाळणे शक्य नाही असे म्हटले आहे. क्लॉड अल्वारिस बोलताना म्हणाले, “हे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे आदेश आहे. त्यांनी राज्य सरकारला (State Government) काही आठवड्यांपूर्वीच हे काम पूर्ण करण्यासाठी पत्र लिहिले आहे. वनमंत्र्यांनी हे नाकारून चालत नाही. तो राष्ट्रीय आदेश आहे. ते केंद्राला काय स्पष्टीकरण देतील की गोवा हे एकमेव राज्य आहे जे राष्ट्रीय आदेशाचे पालन करणार नाही?”

गोव्याचे (goa) वनमंत्री विश्वजित राणे यांनी महादयी वन्यजीव अभयारण्य आणि त्याच्या सभोवतालचा संरक्षित परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शक्यता फेटाळून लावली.

राज्याच्या ईशान्य भागात असलेल्या महादयी वन्यजीव अभयारण्याभोवतीचा संपूर्ण परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याच्या पर्यावरणवाद्यांनी केलेल्या मागणीला विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांनी नुकतेच फेटाळून लावले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, म्हादई अभयारण्याला ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर केल्यास संपूर्ण राज्यावर त्याचे परिणाम होतील. जोपर्यंत मी या खात्याचा मंत्री आहे, तोपर्यंत व्याघ्र क्षेत्र प्रस्तावाला मान्यता देणार नाही. असही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले होते. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

मंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यातील वाघ अनिवासी असल्याच्या औचित्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना क्लॉड अल्वारिस म्हणाले, वाघांनाही कळत नाही की तो कर्नाटकचा वाघ आहे की गोव्याचा वाघ आहे. त्याची प्रजाती कुठेही असली तरी संरक्षणास पात्र आहे. मला वाटते की मंत्र्यांनी टिप्पणी करण्यापूर्वी किमान या प्रकरणाचा अभ्यास करायला हवा होता, आम्ही व्याघ्र प्रकल्प प्रत्यक्षात येईल याची खात्री करण्यासाठी लढा सोडणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT