Traffic congestion Dainik Gomantak
गोवा

Harmal News : नववर्षानिमित्त हरमलमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी; गेस्ट हाऊसेस फुल्ल

Harmal News : वाहतूक कोंडीमुळे पोलिसांची झाली दमछाक

गोमन्तक डिजिटल टीम

Harmal News : हरमल, नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीवरही ताण आला असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. यामुळे पोलिसांची बरीच धावपळ उडाली आहे.

दरम्यान, येथील कार्मेल चर्च मैदानावर कार गाड्या पार्क करण्याची सोय केल्याने किनाऱ्यावर होणारी वाहनांची कोंडी टळल्याचे दिसून आले. परंतु वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगसाठी जागा अपुरी पडू लागली आहे. रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा दिसून येत होत्या. पेडणे वाहतूक निरीक्षक विश्वजित चोडणकर वाहतुकीवर नजर ठेवून होते.

पर्यटकांची गोची...

येथील बहुतेक गेस्ट हाऊसेस व हॉटेल्स फुल्ल झाल्याने अनेकांनी आपल्या वाहनात विश्रांती घेण्याची सोय केल्याचे दिसून आले. हॉटेल्स आधीच ऑनलाइन पद्धतीने बुक झाल्याने अखेरच्या क्षणी पोचलेल्या पर्यटकांना पायपीट करावी लागली.

इंटरनेट स्लो, एटीएमवर गर्दी

वाढलेल्या पर्यटकांचा परिणाम येथील इंटरनेट सेवेवर देखील झाला आहे. गेले दोन दिवस ही सुविधा खूपच स्लो झाल्याने संपर्क साधणे कठीण झाले आहे. व्यावसायिकांना लोकेशन पाठवणे शक्य न झाल्याने अनेकांना रस्त्यावर तात्कळत राहावे लागले.

त्यामुळेही वाहतूक कोंडीचे प्रकार घडले. दरम्यान, येथील एटीएम बाहेर पर्यटकांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. मात्र अनेकांनी जीपे, पेटीएमसारख्या सुविधांचा लाभ घेतल्याने रोखीने व्यवहार कमी झाल्याचे व्यावसायिक अरुण पेडणेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT