Hanuman Birth Anniversary Dainik Gomantak
गोवा

Hanuman Jayanti 2023 : मये-शारदानगरात कीर्तन रंगले!

भाविकांची गर्दी : पहाटेपासून मारुती स्तोत्र पठण, पाळणा सोहळा

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : कीर्तन, पाळणा सोहळा आणि श्रीरामभक्त मारुतीरायांच्या जयघोषात शारदानगर-मये येथे हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो हनुमान भक्तांनी श्री मारुतीरायांचे दर्शन घेऊन आपली सेवा अर्पण केली. शारदानगर येथील श्री हनुमान मंदिरात पहाटे चिन्मयी कामत हिचे हनुमान जन्मावर कीर्तन झाल्यानंतर हनुमान जन्म आणि पाळणा सोहळा पार पडला.

सुवासिनींनी श्री हनुमानाला पाळण्यात घालून पाळणागीत म्हटले. आरती आणि मारूती स्तोत्र म्हटल्यानंतर तीर्थप्रसाद झाला. दुपारी आरती, तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद झाला. सायंकाळी हिंदू जनजागृती समितीतर्फे गदापूजन करण्यात आले. दरम्यान, हनुमान जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सप्तनिक मारुतीरायाचे दर्शन घेतले.

उद्या वर्धापनदिन :

शनिवारी (ता.8) श्री हनुमान देवस्थानचा चौथा आणि शारदानगर वेल्फेअर असोसिएशनचा 19 वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दिवाजोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 6.30 वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्यास केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7.30 वा. कलाचेतना वळवय निर्मित "काणी नव्या युगाची'' हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT