Hanjun Police  Dainik Gomantak
गोवा

वेश्याव्यवसायासंबंधीत आरोपीच्या हणजुण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वेश्याव्यसायाशी संबंधित प्रवीण निवृत्ती बोराटे (Praveen Nivruti Borate) (31) पंतनगर- घाटकोपर-मुंबई या प्रमुख दलालाच्या मुसक्या आवळल्या असून त्याची पाच दिवसांच्या रिमांडवर स्थानिक पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली: बार्देशातील  बागा-हडफडें येथील टेकडीवर असलेल्या स्पाइस हिल्स या कॉटेज हॉटेलामध्ये शनिवारी मध्यरात्री हणजुण पोलिसांकडून (Hanjun Police) टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्याव्यसायाशी संबंधित प्रवीण निवृत्ती बोराटे (Praveen Nivruti Borate) (31) पंतनगर- घाटकोपर-मुंबई या प्रमुख दलालाच्या मुसक्या आवळल्या असून त्याची पाच दिवसांच्या रिमांडवर स्थानिक पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात गुंतलेल्या चौघां परप्रांतीय तरुणींची सध्या मेरशीच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी  दिली.

दरम्यान, राज्यातील पर्यटन हंगाम सुरू होत असल्याची संधी साधत वेश्याव्यसायाशी संबंधित अनेक परप्रांतीय दलाल किनारी भागात सक्रीय झाल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून मिळाली असून याभागातील जाग्रुत लोकांनी यासंबंधात वेळीच स्थानिक पोलिस कक्षाशी संम्पर्क साधण्याचे आवाहन हणजुणचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी जनतेला केले आहे. या कारवाईत हणजुण पोलिस स्थांनकाचे निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उप-निरीक्षक स्नेहा सावळ, हेड-कॉन्स्टेबल शामसुंदर पार्सेकर, विवेकानंद दीवकार, महिला कॉन्स्टेबल. प्रज्ञा नाईक, पुजा नाईक आदींंनी भाग घेतला. ही कारवाई शनिवारी रात्री साडेअकरा ते मध्यरात्री दीड पर्यत सुरु होती. यासंबंधात पुढील चौकशी निरीक्षक सुरज गांवस उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT