River |Goa News Dainik Gomantak
गोवा

Environment: रेल्वेमार्गासाठी बुजविली अर्धी नदी!

सावर्डे येथील झुवारी नदीवर पूल बांधला असून तो उभारण्यासाठी नदीत मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्‍यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात सध्या युद्धपातळीवर रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी सावर्डे येथील झुवारी नदीवर पूल बांधला असून तो उभारण्यासाठी नदीत मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्‍यात आला आहे. त्‍यामुळे अर्धी नदी मातीने बुजून गेली असून येणाऱ्या दिवसांत या नदीच्‍या काठी वसलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे.

सर्व कायदे आणि नियम ढाब्यावर बसवून कामराळ येथे रेल्वे ट्रॅक घालण्यासाठी सखल भाग भरून काढण्यात आला आहे. दुपदरीकरणासाठी सुरू असलेली ही धावपळ पर्यावरणाचा विध्वंस करण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कामाला काही ठिकाणी जोरदार विरोध होत आहे. हा विरोध कुडचडेत होऊ नये म्हणून घाईघाईने काम सुरू आहे. दर दिवशी शेकडो ट्रक माती आणून घातली जात आहे व ही माती कुठून आणली जात आहे हे गुपित मात्र अद्याप उलगडले नाही.

सदर काम जरी रेल्वेच्या जागेत होत असले तरीही त्याचे परिणाम कुडचडेतील सावर्डे नदीकाठच्या मिराबाग, माडेल, धडे, कामराळ या गावांना भोगावे लागणार आहेत.

धडे येथील जुन्या पुलाजवळ समांतर पूल उभारला असून तो जमिनीपासून बराच उंच असल्याने रेल्वे ट्रॅक घालण्यासाठी मातीचा भराव घातला गेला आहे. ही माती खाली जाऊ नये म्हणून अर्धीच संरक्षक भिंत उभारली असून पावसाळ्यात भरावाची माती सखल भागात जाण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

जर ही माती कोसळून खाली आली तर लोकांच्या बागायतींचे नुकसान होणार आहे. सुमारे चौदा ते पंधरा मीटरचा सखल भाग मातीने भरून काढण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे सर्व नैसर्गिक मार्ग बंद झालेले आहेत.

सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन हजार मेट्रिक टन माती या कामासाठी वापरण्यात आली आहे. मातीचा भराव जुवारी नदीच्या काठापर्यत पोचला आले.

रेल्‍वेची दंडेलशाही पर्यावरणावर शेकणार!

रेल्वेच्या कामात अडथळा आणल्यास कायदेशीर करवाई केली जाते अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. मातीचा भराव टाकून नेमके काय केले जात आहे याची कोणतीही कल्पना स्थानिकांना नाही.

तसेच कोणतीही जनसुनावणी न घेता सखल भाग भरून काढला जात आहे. पर्यावरणावरील परिणामांची काहीच माहिती लोकांना देण्यात आलेली नाही. रेल्वेकडून सुरू असलेल्या या दंडेलशाहीचे परिणाम पर्यावरणावर होण्याची भीती लोकांना सतावू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT