Goa Corona Update: कोरोनाच्या नव्या विषाणूची लक्षणे सौम्य आहेत, रुग्णाला इस्पितळात दाखल करावे लागत नाही, असे सरकारचे म्हणणे असतानाच आज एका रुग्णाला इस्पितळात उपचारासाठी दाखल करावे लागले. कित्येक महिन्यांनंतर इस्पितळात दाखल झालेला तो पहिला रुग्ण ठरला आहे.
सध्या राज्यात 51 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 50 जण घरीच अलगीकरणात, तर एकजण इस्पितळात उपचार घेत आहे. राज्यात दिवसभरात कोरोनाचे 16 नवे रुग्ण सापडले. त्यापैकी 15 जणांची लक्षणे सौम्य असल्याने त्यांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. पान ११ वर बुधवारी 322 नमुने दिवसभरात तपासण्यात आले. त्यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्यात पर्यटकांची गर्दी झाली असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आजवर राज्यात कोरोनामुळे ४ हजार १४ जणांचा मृत्यू झाला आहे. २ लाख ६३ हजार ४६४ जणांना लागण झाली होती. ३१ हजार ७६५ जणांना इस्पितळात दाखल केले होते, तर २ लाख ८ हजार ७ जणांनी घरीच अलगीकरणात उपचार घेतले होते. आजवर २ लाख ५९ हजार ३९८ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी जनतेने घाबरून जाऊ नये. राज्य सरकार परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आवश्यकता भासल्यास नागरिकांना योग्यवेळी योग्य त्या सूचना दिल्या जातील.- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.