Haldona Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Haldona Gram Sabha: हळदोणेतील 'झोन' बदलांना आक्षेप, ग्रामसभेत नागरिक आक्रमक; '39 अ' पूर्णपणे रद्द करण्याचा ठराव

Section 39A Zone Changes: नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम '३९ अ'च्या विरोधात हळदोणेतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत हे कलम पूर्णपणे रद्द करण्यात यावे, असा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: नगरनियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम '३९ अ'च्या विरोधात हळदोणेतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत हे कलम पूर्णपणे रद्द करण्यात यावे, असा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते संमत केला. पंचायत क्षेत्रातील विविध भागांमध्ये कलम ३९ अ अंतर्गत होत असलेल्या कथित ''झोन'' बदलांवर गावकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

ग्रामसभा सदस्य नेल्सन फिगेरेदो यांनी हे कलम पूर्णपणे रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताना, बागायती जमिनी, नद्या, नाले, कांदळवने, मिठागरे व जंगले आधीच ''सीआरझेड'' आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कायद्यांअंतर्गत सुरक्षित असताना त्यांना पुन्हा वेगळ्या नावाने का दर्शवले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच हळदोणातील गवार भागातील बागायती जमिनीचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला थॉमस तवारेस, कॉस्मे फर्नांडिस व इतर ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला.

टीसीपी विभागाने कलम ३९ अ अंतर्गत अधिसूचित केलेल्या प्रत्येक सर्व्हे क्रमांकाबाबत पंचायतीने ३० दिवसांच्या मुदतीत मुख्य नगर नियोजकांकडे आक्षेप सादर करावेत आणि त्याची प्रत पंचायतीच्या सूचना फलकावर लावावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

याशिवाय, बांधकामस्थळांवर नियमानुसार माहिती दर्शविणारे फलक लावणे बंधनकारक करण्याची मागणी कॉस्मे फर्नांडिस यांनी केली. परवानग्या आणि परवाने फलकावर न दर्शविणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर प्रकल्पाच्या एकूण अंदाजित खर्चाच्या ५ टक्के दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.

पंचायतीचा पूर्ण विरोध : सरपंच

यावेळी सरपंच ॲश्विन डिसोझा यांनी स्पष्ट केले की, पंचायत या प्रस्तावित झोन बदलांना पूर्ण विरोध करेल आणि रीतसर आक्षेप नोंदवेल. तसेच मागील ठरावानुसार गावात जलतरण तलाव असलेल्या एका मोठ्या प्रकल्पाची परवानगी पंचायतीने यापूर्वीच नाकारल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT