Goa Hill Cutting|Goa Land Conversions Dainik Gomantak
गोवा

Guirdolim Illegal Hill Cutting : जंगली प्राण्यांनी जायचे कुठे ? डोंगरकापणीविरोधात गिरदोली पंचायत आक्रमक

Guirdolim Panchayat Protests Hill Cutting : सासष्टी तालुक्यातील गिरदोली गावात बेकायदेशीरपणे डोंगरकापणी व रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. पंचायतीतर्फे या भागाची पाहणी करण्यात आली व कडक कारवाई करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Guirdolim Illegal Hill Cutting

सासष्टी: सासष्टी तालुक्यातील गिरदोली गावात बेकायदेशीरपणे डोंगरकापणी व रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. पंचायतीतर्फे या भागाची पाहणी करण्यात आली व कडक कारवाई करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

सरपंच सोनिया फर्नांडिस यांनी सांगितले की, आम्ही याबाबत नगरनियोजन खात्याला व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यानी मामलेदारांना कारवाई करण्यास सांगितले आहे.

येत्या एक-दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर आम्ही परत एकदा नगरनियोजन खात्याकडे तक्रार करणार आहोत. पंचायतीने कारवाई करावी असे मामलेदारांनी आम्हाला पत्र पाठविले आहे.

पंच फ्रॅंकी रॉड्रिगीस यांनी सांगितले की, आम्ही या भागाची कित्येकदा पाहणी केली, नगरनियोजन खात्याकडे तक्रार केली. पोलिसांना कळविले तरी काही होत नाही. पोलिस म्हणतात हे त्यांचे काम नाही. येथे रानटी जनावरांबरोबर ससे व अनेक प्रकारेचे पक्षीही आहेत. जर डोंगरकापणी झाली तर या प्राण्यांनी कुठे जायचे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

Goa: गोव्याचा जन्मदर, मृत्यूदर किती आहे? वाचा ताजा अहवाल..

SCROLL FOR NEXT