Tourist On Miramar Beach Dainik Gomantak
गोवा

Guidelines for Tourist in Goa : सावधान! गोव्यात उघड्यावर जेवण, मद्यप्राशन पडणार महागात

50 हजारांपर्यंत दंड; ‘नितळ’ पर्यटनासाठी सरकारकडून नियमावली कडक

गोमन्तक डिजिटल टीम

Guidelines for Tourist in Goa : राज्यात नव्या पर्यटन हंगामाचे वेध लागले असताना सरकारने पर्यटन व्यवसाय स्वच्छ करण्यासाठीची मोहीम सुरू केली आहे. यासाठी आज नवी नियमावली जाहीर करत उघड्यावर जेवण, मद्यपान, समुद्रकिनाऱ्यांवर वाहन नेणे, बोगस दलाल, अवैध फेरीवाल्यांसह भिकाऱ्यांवर 5 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. अर्थात, या कारवाईसाठी खात्याकडे फौजफाट्याची कमतरता आहे. त्यामुळे ही कारवाई कागदोपत्री ठरणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

काही पर्यटक सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते. तसेच बंदी असुनही समुद्रकिनारे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाचे प्रमाण वाढत आहे. शिवाय काहींनी थेट समुद्रात वाहने घातल्याचेही समोर आले आहे. या प्रकारांची गंभीर नोंद घेत असे केल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे खात्याने जाहीर केले आहे. जलक्रीडा उपक्रमात अवैधरित्या दलाल वावरत असून हे थांबवण्यासाठी पर्यटन खात्याकडून प्रयत्न सुरू आहे. स्थानिक पर्यटनाला फटका बसत असल्याने बाहेरील राज्यासाठी पर्यटनाचे पॅकेज देणाऱ्यांवर यापुढे बंदी घातली आहे.

दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे पर्यटक पोलिसांविना

पर्यटन खात्याने कडक नियमावली जाहीर केली असली तरी दक्षिण गोव्यात या कारवाईसाठी एकही पर्यटन पोलिसांची नियुक्ती केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती पर्यटन पोलिस विभागाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिली आहे. तर उत्तर गोव्यात 61 पर्यटक पोलिस आहेत. राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीसाठी किमान आणखी 220 पर्यटन पोलिसांची आवश्‍यकता आहे. पर्यटक पोलिसांच्या कमतरतेमुळे किनारपट्टी सुरक्षेसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पोलिस करणार कारवाई

अवैध फेरीवाले आणि भिकारी यांच्यावरही आता पर्यटन खात्याचे लक्ष राहणार असून पर्यटक आणि गोमंतकीयांना त्रास देणाऱ्यांविरोधात कडक पावले उचलली आहेत. यावर कारवाईचा अधिकार पोलिसांसह जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे खात्याने नमूद केले आहे.

दलालदेखील रडारवर

पर्यटकांबरोबर संपर्क साधणाऱ्यांकडे व्यवसायाची अधिकृत नोंदणी आवश्‍यक आहे. क्रूझ सहलीसाठी येणारे पर्यटक, डेक बेड आणि शॅक्सवर जाणाऱ्या पर्यटकांची सतावणूक करणाऱ्या दलालांवरही कारवाई केली जाईल, असे नियमावलीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! भारताची 18 जहाजे अडकली; देशावर ऊर्जा संकटाचे सावट

VIDEO: गोव्यातील प्रसिद्ध किनारा, पण खाडीचे पाणी मात्र प्रदूषित; काळसर पाण्यामुळे नागरिक, पर्यटक त्रस्त

Bihar Nalanda Stampede: नालंदा हादरले! शीतला देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

Penha De Franca: सफर गोव्याची! आपुलकीनं भरलेलं, साध्या लोकांचं गाव 'बिठ्ठोण'

SCROLL FOR NEXT