Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: शेतकऱ्यांना शेती करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजीपाला लागवडीचे मार्गदर्शन

Sattari Village: कृषी खात्यासह ‘आत्मा’चे आयोजन : असोडेत कार्यशाळेत 30 शेतकऱ्यांनी घेतला लाभ

दैनिक गोमन्तक

Sattari Village: सत्तरी हा कृषिप्रधान तालुका आहे आणि येथील वातावरण भाजीपाला लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे सत्तरीतील शेतकऱ्यांना शेती करून आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्याच्या कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांसाठी दरवेळी विविध योजना राबविल्या जातात.

खोतोडे पंचायत क्षेत्रातील असोडे येथील गावात भाजीपाला लागवडीसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी 30 शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

कृषी खाते शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करत आहे. सत्तरीच्या ग्रामीण भागातील सुमारे 70 टक्के लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे.

वाळपई येथील विभागीय कृषी खाते व आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड करण्याबाबत सहा दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भाजी लागवड कशी व कधी करावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी सेल्फ हेल्प ग्रुपच्या वृंदा गावकर म्हणाल्या, कृषी खात्याचा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.

मातीचे परीक्षण कसे करावे, कुठली जमीन भाजी लागवडीसाठी उपयुक्त आहे याचे सर्वेक्षण कसे करावे, बि-बियाणे कसे पेरावे, याबाबत सविस्तर माहिती व प्रशिक्षण देण्यात आले. आता सत्तरीत सेंद्रिय शेतीव्दारे मोठ्य़ा प्रमाणात शेती केली जाते.

आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय भाजीपाला पौष्टिक असतो. शिवाय बाजारपेठेतही त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी लागवड व बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल, यासाठी कृषी खाते वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. सध्या सेंद्रिय पध्दतीने लागवड केलेल्या भाजीपाल्याला खूप मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाजी लागवड करून स्वयंपूर्ण व्हावे.

आगामी काळात कृषी खात्यातर्फे सत्तरी तालुक्यात वेगवेगळ्या गावांत अशा कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन केले जाईल. - विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी, वाळपई.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT