Green Economy  Dainik Gomantak
गोवा

Green Economy : हरित अर्थव्यवस्थेत गोवा पिछाडीवर, केरळ टॉपवर

Green Economy In Goa : २०१८ पासून नीती आयोगातर्फे देशातील सर्व राज्य, केंद्र शासीत प्रदेशांमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, मूलभूत सोयी, गरिबी निर्मूलन आदी क्षेत्रातील राज्यांची कामगिरी लक्षात घेतली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, नीती आयोगातर्फे देशभरात केलेल्या ‘शाश्‍वत विकास मूल्यांकनात'' (एसडीजी) या वर्षी २०२३-२४ मध्ये गोव्याने तृतीय स्थान पटकावले तरी हरित अर्थव्यवस्था, प्लास्टिक कचरा निर्मिती नियंत्रण, अन्नाची नासाडी अशा महत्त्वाच्या क्षेत्रात गोवा मागे पडला आहे.

आयोगाने जारी केलेल्या विविध निकषांवर गोवा राज्याने ७७ गुणांची कमाई करीत हे यश मिळविले आहे.

केरळ आणि उत्तराखंड ही दोन राज्ये ७९ गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ७८ गुणांसह तामिळनाडू आहे. बिहार राज्य सर्वात शेवटच्या स्थानी राहिले असून, गुणांची सरासरी ७१ निश्‍चित झाली होती.

२०१८ पासून नीती आयोगातर्फे देशातील सर्व राज्य, केंद्र शासीत प्रदेशांमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्वच्छता, मूलभूत सोयी, गरिबी निर्मूलन आदी क्षेत्रातील राज्यांची कामगिरी लक्षात घेतली जाते. २०२०-२१ मध्ये झालेल्या मूल्यांकनात गोव्याने चौथे स्थान पटकावले होते.

यात चांगले गुण

गतवर्षी गोव्याने स्वच्छ पाणी, स्वच्छता, वीज पुरवठा अशा मूलभूत सुविधांमध्ये चांगली गुणांची कमाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

Dhurandhar 2: बॉक्स ऑफिसचा नवा सुलतान! रिलीजआधीच 'धुरंधर 2' ची 119 कोटींची कमाई; 'जवान' अन् 'RRR' ला सोडले मागे VIDEO

SCROLL FOR NEXT