NEET Exam  Dainik Gomantak
गोवा

NEET Exam: ग्रेसीना कुलासो ‘नीट’ परीक्षेत गोव्यात अव्वल

खडतर प्रयत्‍न करा, यश तुमचेच!- ग्रेसीना

गोमन्तक डिजिटल टीम

NEET Exam वास्को येथील सेंट अँड्य्रू उच्च माध्‍यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी ग्रेसीना कुलासो हिने ‘नीट’ परीक्षेत ९९.९१ टक्के (६८० गुण) मिळवून देशभरातील चार हजार विद्यार्थ्यांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी अव्वल ठरली. अनुसूचित जमातीच्‍या या मुलीचे यश त्‍यामुळेच उठून दिसते. देशभरातून तिच्या समुदायातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ती दहाव्या क्रमांकावर आहे.

‘नीट’ परीक्षेत ती देशात १७३८ क्रमांकावर राहिली. स्वतःवर विश्‍‍वास ठेवून खडतर प्रयत्न करीत राहा, यश तुमच्‍या पायाशी येईल, असे सल्ला तिने विद्यार्थ्यांना दिला आहे.

गोवा शिपयार्डचे माजी कर्मचारी जुझे फिलिप कुलासो व इनासिना फर्नांडिस यांची मुलगी असलेली ग्रेसीना ही आपल्‍या यशाचे श्रेय वडील आणि शिक्षकांना देते.

ती म्‍हणाली की, आकाश इन्स्टिट्यूटमधून मी कोचिंग घेतले. गोव्यातील आकाश बायजूच्या मडगाव शाखेची मी विद्यार्थिनी. शिस्‍त आणि चिकाटी हे दोन गुण यशात महत्त्‍वाची भूमिका बजावतात.

प्रत्येक दिवशी आपल्याला शिक्षकांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. शिवाय दर दिवशी शिकवलेल्या पाठ्यक्रमाची न चुकता उजळणी करूनच पुढच्या वर्गाला जायची. दर दिवशी चार ते पाच तास न चुकता अभ्यास करायची.

‘नीट’ परीक्षेत चांगल्या यशासाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. या परीक्षेत प्रथम यावे असे वारंवार वाटायचे. एकच ध्येय नजरेसमोर ठेवले होते व ते म्‍हणजे ही लक्ष्‍यपूर्ती करायचीच. नंतर मागे वळून बघितले नाही आणि माझे स्वप्न पूर्ण झाले, असे ग्रेसीना म्‍हणाली.

नीट परीक्षेत यश संपादन करण्यामागचा हेतू एमबीबीएस हा होता. तो साध्य झाला असून आता पुढील वैद्यकीय शिक्षण दिल्ली किंवा एम्‍समध्ये पूर्ण करण्याची इच्छा आहे, असेही ती म्‍हणाली.

यशासाठी परिश्रम, मेहनत व शिस्‍त गरजेची

माझ्‍या यशाचे अनेकांनी कौतुक करून शुभेच्‍छा दिल्‍या. त्‍यात नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतकांसह कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, जिल्हा पंचायत सदस्य मार्सियाना वाझ, माजी मंत्री प्रकाश वेळीप यांचा समावेश आहे, असे ग्रेसीना म्‍हणाली.

‘नीट’ परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर कठोर परिश्रम, मेहनत व शिस्‍त महत्त्‍वाची आहे. या गोष्टीच यशाचे खरे गमक आहेत. सगळे काही शक्य होईल, असा सल्लाही ग्रेसीना हिने विद्यार्थ्यांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT