Valpoi Sattari Village Court Inaugration|District Judge Irshad Agha Dainik Gomantak
गोवा

Valpoi Gram Nyayalaya: आता गाव पातळीवरच न्याय मिळणार! वाळपईत सुरु झाले गोव्यातील पहिले ग्राम न्यायालय

Sattari Gram Nyayalaya: वाळपई नगरपालिका प्रशासक इमारतीमध्ये ग्राम न्यायालयाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Sattari Mobile Village Court

वाळपई: अनेकदा सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनतेला वरिष्ठ न्यायालयात दाद मागणे कठीण होते. तसेच ग्रामीण भागातील गरीब जनतेसाठी मोठ्या प्रमाणात ते खर्चिकही असते. असे नागरिक न्याय मिळण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी गाव पातळीवरच त्यांना न्याय मिळावा, यासाठी ग्राम न्यायालयाची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश इर्शाद आगा यांनी केले.

वाळपई येथे जिल्हा व सत्र न्यायालय उत्तर गोवातर्फे गोव्याच्या पहिल्या ग्राम न्यायालयाच्या उद्‌घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. वाळपई नगरपालिका प्रशासक इमारतीमध्ये ग्राम न्यायालयाच्या कार्यालयाचे शनिवार, २१ रोजी उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश वसीम रिझवी, वाळपई ॲडव्होकेट फोरमचे अध्यक्ष ॲड. यशवंत गावस, ॲड. राजन सावईकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्राम न्यायालयाचे व ग्राम न्यायालय बसचे फित कापून उद्‌घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन अनुराधा आंद्राद्रे यांनी केले. न्यायाधीश वसीम रिझवी यांनी आभार मानले. यावेळी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण शांताश्री सिनाई कुडचडकर, तसेच मोठ्या संख्येने वकिल, नागरिक, विद्यार्थी व इतरांची उपस्थिती होती.

लोकांच्या दारात पोहोचणार

वाळपई वकील फोरमचे अध्यक्ष ॲड. यशवंत गावस म्हणाले, ग्राम न्यायालय कायदा, २००८ हा भारताच्या ग्रामीण भागात न्यायव्यवस्थेत जलद आणि सुलभ प्रवेशासाठी ग्राम न्यायालय किंवा ग्राम न्यायालयांच्या स्थापनेसाठी लागू केलेला भारतीय संसदेचा कायदा आहे. ग्राम न्यायालयांचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या दारात जाऊन न्याय मिळवून देणे हा आहे.

महिन्यातून दोनदा आयोजन

ग्राम न्यायालयाचे न्यायाधीश वसीम रिझवी म्हणाले, उत्तर गोव्यातील वाळपईत प्रथम न्यायालय स्थापन होत असल्याने अत्यंत आनंद होत आहे. या ग्राम न्यायालयाचा जास्तीत जास्त नागिरकांना फायदा होऊन खटले निकालात काढण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. हे ग्राम न्यायालय महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी भरविले जाणार आहे. तसेच ग्राम न्यायालय बस प्रत्येकाच्या गावात देऊन न्याय देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT