Govt Raises Gambling Fines Dainik Gomantak
गोवा

Govt Raises Gambling Fines: सरदेसाईंच्या स्टिंग ऑपरेशननंतर सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर, जुगार दंडात केली मोठी वाढ

Goa Illegal Live Gaming: आमदार विजय सरदेसाईंनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे गोव्यातील ऑनशोअर कॅसिनोंमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर लाइव्ह गेमिंगचे धक्कादायक वास्तव उघड केले होते.

Sameer Amunekar

पणजी: गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आणि आमदार विजय सरदेसाईंनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे गोव्यातील ऑनशोअर कॅसिनोंमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर लाइव्ह गेमिंगचे धक्कादायक वास्तव उघड केले होते. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशननंतर राज्य सरकारने तात्काळ पावले उचलत जुगाराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील दंड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात लाइव्ह गेमिंगची परवानगी केवळ ऑफशोअर कॅसिनोंमध्ये आहे. मात्र, नियमांचा भंग करून अनेक ऑनशोअर कॅसिनोंमध्ये हे खेळ खुलेआम सुरू आहेत, असा आरोप सरदेसाईंनी केला होता.

या संदर्भात त्यांनी तीन स्टिंग ऑपरेशन्सचे व्हिडिओ शेअर केले होते. १५ जुलै रोजी कॅसिनो गोल्ड (कांदोळी), २७ जुलै रोजी कॅसिनो अटलांटिझ (कळंगुट) आणि ३ ऑगस्ट २०२५ रोजी फिनिक्स कॅसिनो (पिर्णा) या तिन्ही ठिकाणी छुप्या पद्धतीने चित्रीकरण करण्यात आले आहे. तिन्ही ठिकाणी कॅसिनोंमध्ये हे खेळ खुलेआम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

गोव्यातील कायद्यानुसार, लाइव्ह गेमिंगसाठी परवानगी केवळ ऑफशोअर कॅसिनोंना आहे. तरीदेखील ऑनशोअर कॅसिनोंमध्ये हा प्रकार सुरू असणं म्हणजे कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचं सरदेसाईंनी म्हटलं होतं.

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारनेही याची दखल घेतली. गृह विभागाने गोवा सार्वजनिक जुगार कायदा, १९७६ अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांवरील दंडात वाढ करणारी अधिसूचना जारी केली आहे.

"दंड वाढवल्याचा मला आनंद आहे, पण महसूल तोटा आणि नियमभंग थांबवण्यासाठी आम्ही सरकारचं लक्ष वेधत आहोत," असे विजय सरदेसाई यांनी म्हटलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

न्यूयॉर्कमध्ये रश्मिका-विजयचा बोलबाला! 43व्या इंडिया डे परेडमध्ये 'Co-Grand Marshals' चा मान

Viral Video: प्रसिध्द होण्यासाठी कायपण, तरूणीने म्हशीच्या अंगावर चढून केला डान्स, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

SCROLL FOR NEXT