Durgadas Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa School Reopening: 'इगो' बाजुला ठेवा! शाळा उशिराने सुरु करण्याबाबत दुर्गादासांची मुख्यमंत्र्यांना पुन्हा विनंत

Goa School Reopening: सभापती तवडकर यांनी देखील याबाबत सकारात्मकता दाखवल्याने दुर्गादास कामत यांनी पुन्हा मुख्यंत्र्यांना याप्रकरणी विचार करण्याची विनंती केलीय.

Pramod Yadav

Goa School Reopening

लोकसभा मतमोजणीच्या दिवशीच गोव्यातील शाळा सुरु होत असल्याने दोन दिवस उशिराने शाळा सुरु कराव्यात अशी मागणी गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी केली. पण, शाळा याच दिवशी सुरु होतील असे मुख्यमंत्री म्हणाल्याने विषयावर पडदा पडला असे वाटले.

दरम्यान, सभापती तवडकर यांनी देखील याबाबत सकारात्मकता दाखवल्याने दुर्गादास कामत यांनी पुन्हा मुख्यंत्र्यांना याप्रकरणी विचार करण्याची विनंती केलीय.

लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी जाहीर होणार असून, याच दिवशी गोव्यात शाळा देखील सुरु होणार आहेत. दरम्यान, यादिवशी शिक्षक मतमोजणीत गुंतलेले असतील त्यामुळे शाळेचे कामकाज सुरळीत होणार नाही. असा दावा करत शाळा दोन दिवस उशिराने सुरु कराव्यात अशी मागणी गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी 27 मे रोजी केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी शाळा सुरु करण्याच्या तारखेत कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. यामुळे हा विषय त्याच दिवशी संपला असे वाटत होते.

दरम्यान, सभापती तवडकर यांनी देखील शाळा दोन दिवस उशिराने सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कामत यांनी सभापतींच्या मताचा संदर्भ देत या मागणीचा पुन्हा विचार करण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना केली आहे.

दुर्गादास कामत यांनी तवडकरांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा विचार करावा अशी मागणी केलीय. तसेच, सरकारने इगो बाजुला ठेवावा, असेही कामत यांनी एक्सच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT