Goa Police Transfer News| Goa Police News Updates Dainik Gomantak
गोवा

सात आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

चंदीगढ येथील ओमवीर सिंग यांची गोव्यात बदली

दैनिक गोमन्तक

पणजी : गृह मंत्रालयाने ॲग्मूट केडरमधील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांंचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये गोव्यातील पाच आयएएस दिल्लीत तर त्यांच्या जागी चारजण गोव्यात आले आहेत. आयपीएसमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची दिल्लीला बदली झाली असून दोघेजण गोव्यात आले आहेत. त्याचबरोबर नगरनियोजन खात्यामधील 11 नगरनियोजक व उप नगरनियोजकांच्या बदल्यांचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.

एग्मूट आयएएस केडरच्या 1997 बॅचचे व्ही. चंदावेलू, संजीव अहुजा (2008), संदीप जॅकीस (2009), सुभाष चंद्रा (2009) यांची दिल्ली येथून गोव्यात बदली झाली आहे, तर गोव्यातील संजय गिहार (2008), तारीक थॉमस (2011), चोका राम गर्ग (2008), विवेक एच. पी. (2016) व हेमंत कुमार (2013) यांची दिल्ली येथे बदली झाली आहे.

एग्मूट आयपीएस केडरच्या परमादित्य (2005) यांची गोव्यातून दिल्ली येथे तर अरुणाचल प्रदेशमधील आयपीएस बॉस्को जॉर्ज तसेच चंदीगढ येथील ओमवीर सिंग (2004) यांची गोव्यात बदली झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी गोव्यातून बदली झालेले पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार यांना गोवा पोलिस सेवेतून मुक्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT