Tribal Sports Sandip Desai
गोवा

आदिवासी क्रीडापटूंसाठी कौशल्य, गुणवत्तेची संधी : क्रीडामंत्री गोविंद गावडे

राज्यस्तरीय आदिवासी क्रीडा महोत्सव 11, 12 मे रोजी होणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यातील आदिवासी क्रीडापटूंना ट्रायबल स्पोर्टसच्या माध्यमातून त्यांचे क्रीडा कौशल्य व गुणवत्ता प्रदर्शित करण्याची संधी लाभत असून ग्रामीण भागातील कच्ची प्रतिभा विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राज्यस्तरीय ट्रायबल स्पोर्टस महोत्सव येत्या 11 व 12 मे रोजी फोंडा क्रीडा संकुल व काराय-शिरोडा येथील मैदानावर होणार आहे. या महोत्सवाच्या `गरुड` या बोधचिन्हाचे क्रीडामंत्री गावडे यांच्या हस्ते अनावरण झाले.

यावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, प्रशिक्षक संचालक ब्रुनो कुतिन्हो, सहाय्यक संचालक नवीन आचार्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ``अशाप्रकारच्या महोत्सवामुळे आदिवासी समुदायातील क्रीडापटूंना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. विविध प्रकारचे अडथळे आणि कारणांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील क्रीडापटूंना योग्य व्यासपीठाअभावी संधीस मुकावे लागते. हा महोत्सव अशा क्रीडापटूंना खास व्यासपीठ मिळवून देईल. ज्याद्वारे या क्रीडापटूंना आवश्यक प्रेरणाही मिळेल. राज्यातील आदिवासी क्रीडापटूंत राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्षमता आहे.``

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ११ रोजी फोंडा क्रीडा संकुलात सकाळी साडेदहा वाजता स्पर्धेचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल.

आकडेवारीत राज्यस्तरीय ट्रायबल स्पोर्टस

गोव्यात २००८ साली सर्वप्रथम स्पर्धा

या वर्षी व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो, टेनिस बॉल क्रिकेट, लगोरी, लंगडी, रस्सीखेच हे ७ खेळ

यंदा १२ तालुक्यांतील १७७६ खेळाडू, ६५९ तांत्रिक अधिकारी

दोन दिवसीय महोत्सवात एकूण २४३५ जणांचा सहभाग

एकूण ३,५५,००० रुपयांची बक्षिसे

राष्ट्रीय ट्रायबल स्पोर्टसचे नियोजन

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे गोव्यात यशस्वी आयोजन झालेले आहे. हा धागा पकडून क्रीडामंत्री गावडे यांनी देशातील आदिवासीबहुल राज्यातील क्रीडापटूंसाठी राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. ``अशा स्पर्धांमुळे राज्यातील आदिवासी क्रीडापटूंना बहुमुल्य अनुभव प्राप्त होईल,`` असे त्यांनी नमूद केले.

आदिवासी क्रीडापटूंचा सन्मान होणार

यावेळच्या ट्रायबल स्पोर्टसमध्ये राज्यातील विविध खेळातील नावाजलेल्या क्रीडापटूंचा सन्मान करण्यात येईल. यामध्ये रॉवलिन बोर्जिस (फुटबॉल), अंकिता गावडे (बेसबॉल), दीपक गावकर (खो-खो), दीपेश जल्मी (मल्लखांब), नितीन सावंत (व्हॉलिबॉल), सर्वेश गावडे (टेनिस बॉल क्रिकेट), साहिश गावडे (कबड्डी) या क्रीडापटूंचा समावेश असल्याची माहिती क्रीडामंत्री गावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT