Govind Gaude X
गोवा

Govind Gaude: मंत्री गावडे, राजीनामा द्या! भाजप श्रेष्ठींकडून सूचना; ‘उटा’चे दबावतंत्र झुगारले

Govind Gaude Resignation: गोव्यातील सत्तारूढ भाजपमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात झाली असून, आगामी दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदलाचे नवे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Sameer Panditrao

पणजी : मंत्रिपद अबाधित ठेवण्यासाठी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ‘उटा’ या आदिवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांना पुढे करून केलेली दबावनीती भाजपने झुगारली आहे. गावडे यांनी राज्यात परतताच राजीनामा द्यावा, अशी सूचना त्यांना पक्षश्रेष्ठींनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याबाबत सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्री कार्यालयाकडून गावडे यांच्याबाबत सविस्तर अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आला आहे. त्याची दखल घेत गावडे यांना राजीनामा देण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी केली आहे.

राज्यातील या घडामोडींची माहिती भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे पोचली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांना याआधी दिलेल्या अहवालात यापैकी काही बाबींचा उल्लेख होता. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य पक्षश्रेष्ठींना पटले आहे. त्यामुळे त्यांनी गावडे यांना राजीनामा देण्याची सूचना केली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कोणा-कोणाला संधी?

गोव्यातील सत्तारूढ भाजपमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात झाली असून, आगामी दिवसांत मंत्रिमंडळ फेरबदलाचे नवे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातून कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते आणि कोण मंत्रिपद गमावणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गावडेंविषयी पक्षात नाराजीचा सूर

गोविंद गावडे हे आधी अपक्ष आमदार होते. नंतर ते भाजपमध्ये आले. तरीही त्यांनी पक्ष संघटनेशी जुळवून घेतले नाही, अशा तक्रारी पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यांच्या कार्यशैलीवर पक्षांतर्गत बरीच नाराजी असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावडे यांच्याविरोधात नाराजीचे सूर उघडपणे ऐकू येत होते.

फळदेसाईंशी झाली चर्चा

या पार्श्वभूमीवर समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा आगामी फेरबदलासंदर्भात असून, त्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधण्याचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्याचे सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घ्यायचे झाल्यास फळदेसाई यांच्याकडे सभापती पदाची धुरा सोपवली जाऊ शकते.

फेरबदल घाईगडबडीत नाही

राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी भाजप पक्ष संघटनेचा आग्रह असला तरी तूर्त गावडे यांच्यावरील कारवाईपुरताच विषय मर्यादित ठेवण्यात यावा, असा एक मतप्रवाह सत्ताधारी गोटात आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय घाईघाईने हाताळू नये, असे मत यानिमित्ताने ऐकू येत आहे.

स्वत:हून राजीनामा देण्याची संधी

गोव्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले असून, गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव असला तरी मुख्यमंत्री गावडे यांना स्वतःहून राजीनामा देण्याची संधी देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

निवडणुकीआधीच...

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात लहानसहान बदल झाले असले तरी, हे फेरबदल अधिक व्यापक असतील, अशी शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नवचैतन्य निर्माण करणे, हा हेतू असल्याचे कळते.

दिल्लीत होणार बैठक

३१ मे रोजी दिल्ली येथे गोवा भाजपशी संबंधित बैठक होणार आहे. या बैठकीत फेरबदलाची अधिकृत रूपरेषा ठरवली जाऊ शकते. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि राष्ट्रीय पातळीवरील काही वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

आकांक्षांना धुमारे

फेरबदलाच्या निमित्ताने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे. कार्यक्षम, शिस्तप्रिय आणि जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या आमदारांनाच पुढे आणण्याची दिशा पक्षाने घेतली असून, त्या अनुषंगाने फेरबदल होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांचे नाव त्यासाठी घेतले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT