Goa governor PS Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

राज्यपालांकडून गोव्यातील आरोग्य संस्थांना अर्थसाहाय्य

राजभवनद्वारे धनादेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय वैद्यकीय संघटना गोवा शाखा, गोवा कर्करोग सोसायटी व गोवा चेंबर ऑफ कॉमर्स या तिन्ही संस्था जनतेच्या हितासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. राजभवनद्वारे जेवढी मदत करणे शक्य आहे, तेवढी करण्याचा प्रयत्न आम्ही करू. या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा असल्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. जीसीसीआयच्या सुरेंद्र तिबलो सभागृहात भारतीय वैद्यकीय संघटना, गोवा शाखा आणि कर्करोग सोसायटी यांच्या कार्याची दखल घेत राजभवनद्वारे धनादेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. शेखर साळकर म्हणाले, राज्यपालांकडून जो निधी देण्यात आला आहे. त्याचा योग्य तो वापर केला जाईल. त्यांनी कर्करोगासंबंधी भारतीय वैद्यकीय संघटना व मणिपाल हॉस्पिटल देत असलेल्या सुविधांबद्दल भाष्य केले.

भारतीय वैद्यकीय संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष रूफिनो मोंतेरो म्हणाले, गोव्यातील युवावर्ग परदेशात जात असल्याने घरी असणाऱ्या जेष्ठांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आमच्या संघटनेकडून आरोग्य तसेच मानसिक पाठबळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. महेंद्र कुडचडकर, विश्‍वनाथ माशेलकर, मेधा साळकर, बबिता आंगले, मनोज प्रभुदेसाई, इंदु ठाकूर आदींनी गोव्यातील भारतीय वैद्यकीय संघटनेच्या विविध शाखांच्या वतीने धनादेश स्विकारले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT